लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वच्छता हीच सेवा अभियानांतर्गत शहरात नगर पालिकेच्या वतीने सोमवारी राबविण्यात आलेल्या महास्वच्छता अभियानात दीडशे टन कच-याचे संकलन करण्यात आले. या अभियानात शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाºयांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.गांधी चमन चौकातून काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीने या अभियानाची सुरुवात झाली. या वेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आ. कैलास गोरंट्याल, माजी आ. संतोष सांबरे, माजी आ. अरविंद चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, उपाध्यक्ष भास्कर दानवे, उद्योगपती घनश्याम गोयल, ब्रह्मानंद चव्हाण, विलास नाईक, वीरेंद्र धोका, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील सर्व नगरपालिका, १५ जिल्हे व २८ हजार गावे हागणदारीमुक्तझाली आहेत.खा. दानवे म्हणाले की, स्वच्छतेच्या कामासाठी मनुष्यबळाची उणीव असेल तरी यांत्रिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात स्वच्छता केली जाते. त्याचा अधिकाधिक वापर करून घ्यायला हवा.शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेला महत्त्व देण्याची गरज असल्याचे राज्यमंत्री खोतकर यांनी सांगितले. संपूर्ण शहरात दिवसभर राबविण्यात आलेल्या महास्वच्छता अभियानात रोटरी क्लब, लायन्स क्लब, मारवाडी युवा मंच, बियाणे असोसिएशन, शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, विविध कार्यालयांचे अधिकारी, कर्मचाºयांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पालिकेचे ३७० मजूर, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे १७० सदस्य, सात जेसीबी, ३० ट्रॅक्टर, पाच डंपर, १९ घंटागाड्या, एक कॉम्पॅक्टरच्या मदतीने शहरातील विविध भागांतून दीडशे टन कचरा उचलण्यात आल्याचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितले.
शहरात तब्बल दीडशे टन कच-याचे संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 12:45 AM