शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

ग्रामीण भागाची चोहोबाजूने आर्थिक कोंडी

By admin | Published: June 03, 2016 11:37 PM

औरंगाबाद : दुष्काळामुळे मराठवाड्याची परिस्थिती स्फोटक बनली आहे. इथला शेतकरी आर्थिक विवंचेत आहे. रोज चार-पाच आत्महत्या होत आहेत.

औरंगाबाद : दुष्काळामुळे मराठवाड्याची परिस्थिती स्फोटक बनली आहे. इथला शेतकरी आर्थिक विवंचेत आहे. रोज चार-पाच आत्महत्या होत आहेत. आता पेरणी तोंडावर आहे. पण बँका पीक कर्ज द्यायला तयार नाहीत. आदेश आहेत; परंतु चारा छावण्या नाहीत, रोहयोची नीट अंमलबजावणी होत नाही. सर्वच बाजूंनी जणू ग्रामीण भागाची आर्थिक कोंडी केली जात आहे, असे मत भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य राजन क्षीरसागर यांनी व्यक्त केले. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जविषयक मागण्यांसाठी भाकपच्या वतीने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मुख्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. भाकपचे नेते राजन क्षीरसागर हे आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत. हे आंदोलन आणि त्यांच्या मागण्या या अनुषंगाने क्षीरसागर यांच्याशी साधलेला संवाद. ल्ल प्रश्न- तुमच्या प्रमुख मागण्या कोणत्या?- खरीप हंगाम तोंडावर आहे; पण आज शेतकऱ्यांकडे पैसा नाही. त्याला पीक कर्ज मिळाल्याशिवाय पेरणी करणे अशक्य आहे. रिझर्व्ह बँक आणि नाबार्डनेही परिपत्रक काढून शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याविषयी बँकांना निर्देश दिलेले आहेत; परंतु महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून पीक कर्ज दिले जात आहे. मराठवाड्यातील ग्रामीण भागातील ही प्रमुख बँक आहे. या बँकेवर सुमारे ३ हजार गावांतील शेतकरी अवलंबून आहेत. त्यामुळे जुन्या कर्जाचे पुनर्गठण करावे, नवीन खातेदारांना पीक कर्ज द्यावे, रोहयोंतर्गत विहीर मिळालेल्या शेतकऱ्यांना मोटार पाईपलाईन, ठिबक सिंचनासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे या आमच्या प्रमुख मागण्या आहेत.ल्ल प्रश्न- पीककर्ज न मिळण्याचे कारण काय?- महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अधिकाऱ्यांकडे आम्ही विचारणा केली, त्यांच्याकडे भांडवल नसल्याचे ते सांगतात. पण ही सरकारी बँक आहे. राज्य सरकारने पीक कर्ज वाटपाच्या सूचना या बँकेला दिलेल्या आहेत. पण त्यासाठी आर्थिक तरतूद मात्र केलेली नाही. इकडे जीआर काढायचा आणि दुसरीकडे पैसे नाही म्हणायचे असे सरकारचे धोरण आहे. ही एकप्रकारे जनतेची फसवणूकच आहे. मराठवाड्यात रोज चार-पाच शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मात्र सरकारला त्याचे गांभीर्य नाही. ल्ल प्रश्न- पीक कर्जाशिवाय तुमच्या इतरही काही मागण्या आहेत का?- दुष्काळामुळे इथला शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचला आहे. त्याला पुन्हा उभे करण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतील. यामध्ये प्रामुख्याने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्ज माफी देणे गरजेचे आहे. त्याकरिता केंद्र सरकारने २५ हजार कोटी रुपयांची विशेष मदत द्यावी. पीक विम्याची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना अदा करावी, संपूर्ण कर्ज वाटप प्रक्रिया ३० जूनपूर्वी पूर्ण करण्यासाठी यंत्रणा राबवावी, चारा टंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांना बैल विकावे लागले आहेत, त्यांना बैल घेण्यासाठी पूरक कर्ज उपलब्ध करून द्यावे, नवीन कर्ज संपूर्ण पत मर्यादेनुसार द्यावे असे आमचे म्हणणे आहे. आंदोलनाची पुढील भूमिका काय राहील?पीक कर्ज मिळाल्याशिवाय शेतकऱ्याची तिफण चालणार नाही. सध्या बँका कर्ज देत नाहीत. त्यामुळे गावात जाऊन काही होणार नाही. म्हणून पीक कर्ज मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल. गावात राहून मरण्यापेक्षा बँकेच्या दारातच मरू.