औरंगाबाद : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री शहरात कोम्ंिबग आॅपरेशन राबविले. यामध्ये ३२३ वाहने, ५५ हॉटेल्स, लॉज आणि बारची तपासणी करण्यात आली. तसेच काही संशयितांची धरपकड करण्यात आली.
पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत १७ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ५ वाजेदरम्यान कोम्बिंग आॅॅपरेशन राबविण्यात आले. या आॅपरेशनमध्ये ३२३ वाहनांची पोलिसांनी तपासणी केली.
यात १८ वाहनांवर मोटारवाहन कायद्यानुसार केसेस करून ४ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. अवैध दारू विक्री करताना दोघांना पकडण्यात आले. तीन हद्दपार आरोपींना अटक करण्यात आली. ३२ आरोपींना जामीनपात्र वॉरंट बजावले. ४७ आरोपींवर अजामीनपात्र वॉरंट बजावून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. दारू पिऊन वाहन चालविताना १३ जणांना पकडण्यात आले.
या आॅपरेशनमध्ये पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त निकेश खाटमोडे, उपायुक्त राहुल खाडे, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ४० अधिकारी आणि २१० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.