शहरं
Join us  
Trending Stories
1
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
4
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
5
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
6
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
7
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
8
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
9
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
10
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
11
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
12
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
13
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
14
Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले
15
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
16
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
17
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
18
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
19
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
20
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

राजेंद्र जैनकडून चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सराफाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 12:08 AM

आरोपी राजेंद्र जैनकडून अल्पदरात चोरीचे सोने खरेदी केल्याच्या संशयावरून शहरातील एका सराफाला विशेष तपास पथकाने सोमवारी सायंकाळी अटक केली.

ठळक मुद्देविशेष तपास पथकाची कारवाई राजेंद्र जैन याने पोलिसांसमोर उघडले तोंड,कमी भावात चोरीचे सोने खरेदी

औरंगाबाद : वामन हरी पेठे ज्वेलर्समधून कोट्यवधी रुपये किमतीच्या सुवर्णालंकाराची हेराफेरी करणारा आरोपी राजेंद्र जैनकडून अल्पदरात चोरीचे सोने खरेदी केल्याच्या संशयावरून शहरातील एका सराफाला विशेष तपास पथकाने सोमवारी सायंकाळी अटक केली. सुवर्णालंकार हेराफेरीतील ही चौथी अटक आहे.

राजेश ऊर्फ राजू सेठिया (५०, रा. उस्मानपुरा) असे सराफाचे नाव आहे. सेठिया याचे सराफ्यात जडगाववाला ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान आहे. विशेष तपास पथकाचे निरीक्षक श्रीकांत नवले यांनी सांगितले की, राजेंद्र जैनच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी वाढली. यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे तो देऊ लागला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने काही किलो सोन्याचे दागिने जडगाववाला ज्वेलर्सचा मालक राजेश सेठियाला विक्री केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस जैनला घेऊन सेठियाच्या दुकानात गेले. तेथे त्याने सोने घेणारा राजेश सेठिया हाच असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी राजेश सेठियाला ताब्यात घेऊन आर्थिक गुन्हे शाखेत नेले. तेथे रात्री उशिरापर्यंत सेठियाची चौकशी वरिष्ठ अधिकारी करीत होते.

२२ हजार रुपये प्रतितोळा दराने घेतले सोनेराजेश सेठियाने राजेंद्र जैनकडून २२ हजार रुपये प्रतितोळा याप्रमाणे सोन्याचे दागिने खरेदी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सुमारे ३० किलो दागिने सेठियाला दिल्याचे राजेंद्र जैनने पोलिसांना सांगितले. सेठिया मात्र आपण राजेंद्र जैनकडून दागिने खरेदी केलेच नसल्याचे पोलिसांना सांगत होता. सेठिया पोलिसांनाही उडावाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांनी संशयावरून सेठियाला अटक केली.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारीGoldसोनंArrestअटकPoliceपोलिस