शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

जायकवाडी पक्षी अभयारण्यात पक्ष्यांचे आगमन लांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 4:22 AM

पैठण : ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत हजारोंच्या संख्येने नाथसागराच्या जलाशयावर येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांनी यंदा चक्क जायकवाडी पक्षी अभयारण्याकडे पाठ फिरवली ...

पैठण : ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत हजारोंच्या संख्येने नाथसागराच्या जलाशयावर येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांनी यंदा चक्क जायकवाडी पक्षी अभयारण्याकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे. अभयारण्यात पक्ष्यांच्या अधिवासावर आलेली बंधने व हवामानातील बदलांमुळे निसर्गचक्रावर झालेल्या परिणामांचा फटका स्थलांतरित पक्ष्यांना बसला असल्याने यंदा अनेक पक्षी अद्याप दाखल झाले नसल्याचे पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

यंदा डिसेंबर महिना उजाडल्यानंतरही पक्ष्यांचे आगमन न झाल्याने पक्षीमित्रांत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. साधारणतः ऑक्टोबरच्या मध्यानंतर हे पक्षी जायकवाडी धरणाच्या जलाशयावर दिसून येतात. पुढे फेब्रुवारी अखेरपर्यंत ते मुक्काम ठोकतात. नाथसागराचा दागिना म्हणून गौरविण्यात आलेला फ्लेमिंगो ऊर्फ रोहित पक्ष्याचे आगमन अद्याप न झाल्याने पक्षीमित्र हिरमुसले आहेत. जलाशयावर दरवर्षी हजारोंच्या संख्येने येणारी बदके, करकोचे, कुराव, सुरेय, हे पक्षी दुर्मीळ झाले आहेत. स्थानिक पक्ष्यांत मुग्धबलक, चमचा, शराटी, सुरय, कुरव, शेकाट्या, धनवर बदक, पाणकावळे, राखी सारंग, रंगीत करकोचे हे यंदा कमी संख्येने दिसून येत आहेत. वारकरी बदक, पाणकोंबडी, पाणडुबी, पाणभिंग्री या पक्ष्यांचे तर अद्याप दर्शन झालेले नाही. परदेशी पक्ष्यांमध्ये माळभिंगरी, किरा, तुत्वार, पट्टेरी हंस, थापट्या बदक, मत्स्य गरुड, पायमोज गरुड, पाणघार, पाणलावा, पाणटिवळा हे पक्षी कमी संख्येने आले आहेत. क्रौंच पक्षी, तरंग बदक, चक्रांग बदक, तलवार बदक, भुवई बदक, हिरवा तुटवार हेसुद्धा जलाशयावर दिसले नाहीत. बार हेडेड गुज, पिनटेल, पोचार्ड, जॅगवेल, सँड पायपर, ग्रीन शॅक, रेड शॅक, व्हॅगटेल, चक्रवाक, अशा पक्ष्यांना टिपण्यासाठी छायाचित्रकार जायकवाडी पक्षी अभयारण्यात वेळ व्यतीत करतात. यंदा मात्र पक्ष्यांची आतुरतेने प्रतीक्षा करण्यात येत आहे. दरम्यान, डिसेंबरअखेरपर्यंत धरणावर पक्ष्यांचे बऱ्यापैकी आगमन होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पक्ष्यांच्या अधिवासावर अतिक्रमण

जायकवाडी धरण १००% भरलेले असून, लगतच्या गाळपेरा क्षेत्रात शेती होत असल्याने पक्ष्यांना यंदा उतरण्यासाठी जागा राहिलेली नाही. शिवाय शेंद्रा औद्योगिक वसाहत, जालना पाणीपुरवठा योजनेसहित अनेक योजनांच्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामांमुळे पक्ष्यांची बसण्याची हक्काची जागा हिरावली गेली आहे.

कोट

पक्षी जीवनचक्र बदलाची अभ्यासकांनी नोंद घेतली आहे.

जगभरात होत असलेल्या हवामान बदलामुळे पक्ष्यांचे जीवनचक्र बदलत आहे. अभ्यासकांसाठी हा चिंतेचा विषय झाला असून, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अभ्यासकांनी या बदलाची नोंद घेतली आहे. रशिया, उत्तर युरोप, मंगोलिया, कॅनडा, चीन आणि जपानच्या काही भागांतील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळतो आहे. पूर्वी जमिनीवर तीन फुटांपर्यंत उंचीचे बर्फाचे थर पाहायला मिळायचे. आता त्यांची जाडी कमी झाली आहे. वातावरणातील या बदलामुळे जगाच्या हवामानावर परिणाम होत आहे.

-डॉ. किशोर पाठक, पक्षीमित्र, औरंगाबाद

फोटो आहे.