शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कृत्रिम पाऊस पश्चिम महाराष्ट्रात; विमानाचा थांबा मराठवाड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 3:30 PM

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र मराठवाड्याऐवजी पश्चिम महाराष्ट्रात उभारल्यानंतर आता पुन्हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार शासनाकडून झाला आहे

ठळक मुद्देसोलापूर व परिसरात कृत्रिम पावसाचा प्रयोग आगामी चार महिन्यांसाठी केला जाणारवापरण्यात येणारे विमान मात्र औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेईल.

- विकास राऊत 

औरंगाबाद : कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र मराठवाड्याऐवजी पश्चिम महाराष्ट्रात उभारल्यानंतर आता पुन्हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार शासनाकडून झाला आहे. सोलापूर व परिसरात कृत्रिम पावसाचा प्रयोग आगामी चार महिन्यांसाठी केला जाणार असून, त्यासाठी वापरण्यात येणारे विमान मात्र औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेईल. ज्या दिवशी प्रयोग नसेल, त्या दिवशी विमान येथेच थांबेल.

केंद्रीय विज्ञान मंत्रालय व राज्य शासनाच्या साहाय्याने सोलापूर व परिसरात कृत्रिम पावसाचा प्रयोग ३ जुलैपासून सुरू झाला आहे. २५० कोटींच्या खर्चाची तरतूद यासाठी करण्यात आली असून, त्यातून दोन विमानांची खरेदी देखील करण्यात येणार आहे. ती विमाने कोणत्या विमानतळावर थांबतील, याबाबत अद्याप काहीही सूचना नाहीत. 

सोलापूर, सांगली जिल्ह्यांतील मानदेशाचा कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा, उस्मानाबाद, लातूर व शेजारच्या कर्नाटकातील बीदर या पर्जन्य छायेतील प्रदेशाला याचा लाभ होईल, असा दावा केला जात आहे. त्यामुळे सोलापूर येथे सी-डॉप्लर रडार बसविण्यात आले आहे. जून २०१५ मध्ये मराठवाड्यात क्लाऊड सीडिंगचा (कृत्रिम पावसाचा प्रयोग) करण्यात आला होता. त्यासाठी औरंगाबाद विभागीय आयुक्तालयाच्या चौथ्या मजल्यावर सी-डॉप्लर रडार बसविण्यात आले होते. २७ कोटींचा खर्च त्यासाठी झाला होता. ख्याती वेदर मॉडिफि केशन या कंपनीला तीन वर्षांपूर्वी कंत्राट दिले होते. आता तीच कंपनी सोलापूर परिसरात प्रयोग करणार आहे. 

पुण्यातील भौतिकशास्त्र तथा हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले, मुळात सोलापूरला केंद्र स्थापन करणे हे भौगोलिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारे नाही. ३ जुलैपासून सोलापूर येथून कृ त्रिम पावसाचा प्रयोग सुरू झाला आहे. कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र एका राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असायला हवे असल्याचे ते म्हणाले.

या प्रश्नाची उत्तरे मिळेनात प्रयोगासाठी वापरण्यात येणारी स्फोटके कुठे ठेवणार, सोलापूर परिसरात प्रयोग केल्यानंतर विमान औरंगाबादेत थांबल्यानंतर उड्डाण घेताना मराठवाड्यातही सिलव्हर कोटेड सिलिंडर हवेत सोडणार की फक्त उड्डाण घेणार. विमान यावर्षी खरेदी करण्यात येणार आहे की नाही. खरेदी केल्यास त्यासाठी औरंगाबादची धावपट्टी वापरणार काय, यासारखे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. 

का हवे होते औरंगाबादला केंद्र३०० ते ४५० कि़ मी. परिसर औरंगाबाद येथून मुंबई, पुणे, अकोला, जळगाव-धुळे, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा व पूर्ण मराठवाड्यातील परिसरातील दुष्काळग्रस्त भाग यामुळे नियंत्रित होऊ शकतो; परंतु २०० कि़मी.च्या अंतरातच सोलापूरमधून प्रयोग होणार आहे. त्यामुळे मराठवाड्याला त्याचा फारसा लाभ होणार नाही,असे मत  हवामानतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

आयआयटीएमने सांगितलेआयआयटीएम पुण्याचे जनसंपर्क अधिकारी शिवसाई दीक्षित यांनी सांगितले, विमान औरंगाबादच्या विमानतळावर थांबण्याबाबत निर्णय झाला आहे. औरंगाबाद येथून कृत्रिम प्रयोगासाठी फक्त उड्डाण होईल. सध्या विमान बारामतीमध्ये आहे. सिल्व्हर कोटेड सिलिंडर कुठे ठेवणार, विमान औरंगाबादेतून उडताना सिलिंडर फोडणार की नाही. याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे दीक्षित यांनी सांगितले.  

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळRainपाऊसState Governmentराज्य सरकारMarathwadaमराठवाडा