लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देशात एकूण नऊ अंग भाषा आहेत. त्यापैकी नृत्य ही एक अंग भाषा आहे. प्रत्येक कलाकारालाकलात्मक स्वातंत्र्य असते. नृत्यात कलेचे आणि भाषेचे पावित्र्य जपणे आवश्यक असून, कलाकार व गुरू हीच आमची जात आहे, असे प्रतिपादन महागामीच्या संचालिका व प्रसिद्ध नृत्यांगना पार्वती दत्ता यांनी केले.संडे क्लबच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांनी संवाद साधला. त्या पुढे म्हणाल्या की, औरंगाबादमध्ये आगमन हा माझा लर्निंग आणि टर्निंग पाइंट ठरला. येथे महागामी स्थापन केल्यानंतर नृत्य कलेचाच ध्यास घेतला. वेरूळ येथील लेण्या घडवणाऱ्या कलाकारांचा दृढ संकल्प पाहून मी औरंगाबाद न सोडण्याचा निर्णय घेतला. एखाद्या शिल्पास सुरुवात केल्यानंतर त्यास परिपूर्ण रूप देणे हे आमचे कामच आहे, असेही त्यांनी नमूद केले. याप्रसंगी कथ्थक, कुचीपुडी, ओडिसी, भरतनाट्यम या विविध नृत्य प्रकारांबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. पूर्वीचे ‘दासीअट्टम’ म्हणजे आताचे ‘भरतनाट्यम’ होय. भाव, राग व ताल यांचा अप्रतिम संयोग भरतनाट्यम् या नृत्य प्रकारात असल्याचे त्या म्हणाल्या. सुरुवातीपासूनचा सर्व नृत्य प्रवास पुस्तक रूपात मांडण्याचा मानसही पार्वती दत्ता यांनी व्यक्त केला. अनौपचारिक गप्पांचा समारोप न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी केला. यावेळी संडे क्लबचे श्याम देशपांडे, श्रीकांत उमरीकर, ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ, सुधीर सेवेकर, प्रा. जयदेव डोळे तसेच धनंजय चिंचोलकर, जे. चंद्रकांतन, विनायक भाले, जी.एम. परांजपे, श्रुती तांबे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.संगीत नाटक अकादमी नसल्याची खंतभारतातील बहुतेक राज्यांमध्ये स्वतंत्र ‘संगीत नाटक अकादमी’ची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्रातच अशी अकादमी अद्यापही स्थापन झालेली नाही, अशी खंत पार्वती दत्ता यांनी व्यक्त केली.
कलाकार व गुरू हीच आमची जात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:12 AM
कलाकार व गुरू हीच आमची जात आहे, असे प्रतिपादन महागामीच्या संचालिका व प्रसिद्ध नृत्यांगना पार्वती दत्ता यांनी केले.
ठळक मुद्देपार्वती दत्ता : संडे क्लबशी साधला संवाद