शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

मराठवाडा धर्मप्रांताचे बिशप म्हणून रा.रेव्ह. प्रकाश पाटोळे यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 3:42 PM

पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधीसह झाला पदग्रहण सोहळा 

छत्रपती संभाजीनगर : उत्तर भारतीय ख्रिस्ती महामंडळांतर्गतच्या (सीएनआय) मराठवाडा धर्मप्रांताचे चौथे बिशप म्हणून रा.रेव्ह. प्रकाश पाटोळे यांची दीक्षा व पदग्रहण समारंभ शनिवारी (दि. १४ सप्टेंबर २०२४ रोजी) छावणीतील क्राईस्ट चर्च येथे पार पडला.

बिशप एम.एम. आर्सुड, बिशप ए.के. प्रधान आणि बिशप एम.यू. कसाब यांच्यानंतर बिशप पाटोळे यांनी चौथे बिशप म्हणून पदग्रहण केले. धर्मप्रांताचे सचिव डॉ. लालबहादूर कांबळे यांनी बिशपांचा परिचय करुन दिला व त्यांच्या नेमणुकीच्या अधिकार पत्राचे वाचन केले. रेव्ह. एम.यू. जाधव यांनी प्रार्थना केली. रेव्ह. सुशील घुले व रेव्ह. रंजन राठोड यांनी बिशपांना अधिकार पदाची अंगठी व पाळकीयकाठी प्रदान केली.

यावेळी मार्गदर्शन करताना बिशपांनी सेवेला आणि वक्तशीरपणाला प्राधान्य देण्याचा संदेश दिला. सेवेसाठी पाचारण हा कोणत्याही व्यक्तीचा किंवा समितीचा निर्णय नसतो तर तो दैवी निर्णय असतो, असे ते म्हणाले. धर्मप्रांताचे उपाध्यक्ष रेव्ह. एस.एस. खंडागळे, सचिव डॉ. लालबहादूर कांबळे, खजीनदार डॅनियल अस्वले, सदस्य रेव्ह. रंजन राठोड,रेव्ह.डायना गायकवाड, रेव्ह. आनंद खंडागळे, जेम्स अंबीलढगे, विवेक निर्मळ, राजेश निर्मळ,मंगलाबाई आर्सुड, वैभव उगले, बबीता घुले, अर्चना मोटे आणि स्वप्नील गुडेकर तसेच धर्मप्रांता अंतर्गतच्या छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील सर्व आचार्य, विविध मंडळांच्या पास्टोरेट कमिटीचे पदाधिकारी, मिशनरी, विविध धार्मिक संस्था, महिला मंडळ, तरुण संघ, शाळा, शाबाथ शाळा आदींचे प्रमुख व पदाधिकारी यांच्यासह अनेक भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

मराठवाडा धर्मग्रंथाचा इतिहासउत्तर भारतीय ख्रिस्ती महामंडळाच्या नाशिक धर्मप्रांताचे विभाजन करून २३ जानेवारी १९९९ रोजी मराठवाडा धर्मग्रंथाची स्थापना झाली होती. तत्पूर्वी तत्कालीन औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे १५० वर्षांपासून चर्च मिशनरी सोसायटी (सीएमएस) तर्फे जालना जिल्ह्यात जवळपास दीडशे वर्षापासून स्कॉटिश ख्रिस्ती मिशनऱ्यांचे कार्य चालू होते. १९७० ला वरील दोन्ही मंडळ एकत्रित आल्या होत्या.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा