शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

विद्यापीठाची तब्बल १७५ एकर जमीन भाडेपट्ट्यावर; मात्र मिळते फक्त ११७ रुपये वार्षिक भाडे

By राम शिनगारे | Published: July 04, 2023 12:43 PM

विद्यापीठाने शासनाच्या रेडिरेकनर दरानुसार संबंधित संस्थांना भाडे आकारल्यास विद्यापीठाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळू शकतो

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मालकीच्या ७२५ एकर जमिनीपैकी विविध १४ संस्थांना तब्बल १७५ एकर ४ गुंठे जमीन भाडेपट्ट्यावर दिली आहे. या जमिनीचे विद्यापीठाला प्रतिएकर केवळ ११७ रुपये वार्षिक भाडे मिळते. भाडेपट्ट्यावर दिलेल्या १७५ एकर जमिनीला वार्षिक भाडे २० हजार ४०९ एवढे मिळत असल्याची माहिती समोर आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ स्वत:च्या मालकीची ७२५ एकर जमीन असणारे राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे. या विद्यापीठाच्या क्षेत्रफळावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. त्याचवेळी विद्यापीठाने विविध शासकीय संस्था, वसतिगृहांसाठी मोठ्या प्रमाणात जमीन ३५, ६०, ९० आणि ९९ वर्षांसाठी भाडेपट्ट्याने दिली आहे. यामध्ये राज्य पुरातत्त्व विभाग, सहसंचालक क्रीडा व युवक विभाग, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग, बँक ऑफ महाराष्ट्र, नायलेट संस्था, महाराष्ट्र राज्य वीज मंडळ, जिल्हा सैनिक मुलांचे व मुलींचे वसतिगृह, महानगरपालिका पाण्याची टाकी, आदिवासी मुलाचे वसतिगृह, यशवंत वसतिगृह, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, स्पाेर्ट ॲथोरटी ऑफ इंडिया (साई) आणि शासकीय विज्ञान संस्थेचा समावेश आहे. या सर्व जमिनीच्या भाडेकरारातून विद्यापीठाला वर्षाअखेर २० हजार ४०९ रुपये मिळतात. त्यातील यशवंत वसतिगृहाचे भाडेच १२ हजार रुपये एवढे आहे.

...तर कोट्यवधींचे भाडे मिळेलविद्यापीठाने शासनाच्या रेडिरेकनर दरानुसार संबंधित संस्थांना भाडे आकारल्यास विद्यापीठाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळू शकतो, असा दावा रिपाइंचे (आठवले गट) शहर जिल्हाध्यक्ष नागराज गायकवाड यांनी कुलगुरूंना लिहिलेल्या पत्रात केला आहे. रेडिरेकनर दरानुसार महसूल संबंधित संस्थांकडून विद्यापीठाने वसूल केल्यास शासनाकडून अनुदानही घेण्याची गरज भासणार, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

सर्वात जुना भाडेकरार यशवंत वसतिगृहाचाविद्यापीठात प्रवेश करताच उजव्या हाताला यशवंत वसतिगृह आहे. या वसतिगृहासाठी १० एकर १ गुंठे जमीन देण्यात आलेली आहे. त्यासाठीचा करार हा २७ सप्टेंबर १९६८ साली केलेला आहे. त्यानंतर मनपा, साई, नायलेट, बँक ऑफ महाराष्ट्रासह इतर संस्थांचा नंबर लागतो. आदिवासी वसतिगृहासाठी सर्वात शेवटी म्हणजे २०१५ साली करार करण्यात आलेला आहे.

कोणत्या संस्थेला किती जमीन दिली भाडेपट्ट्यानेसंस्था....................जमिनीचे क्षेत्रफळ.........वार्षिक भाडे......भाडेपट्टाराज्य पुरातत्त्व विभाग (सोनेरी महल)........६ एकर ३ गुंठे.............०१ ..................६० वर्षेसहसंचालक, क्रीडा व युवक विभाग.........४ एकर १४ गुंठे..........१०००...............६० वर्षेभारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग.............१ एकर २० गुंठे...........०१....................९९ वर्षेबँक ऑफ महाराष्ट्र.................................४ गुंठे.......................०१.....................९० वर्षेनायलेट संस्था.......................................१८ एकर २१ गुंठे..........२०२.................९९ वर्षेमहाराष्ट्र राज्य वीज मंडळ......................१ एकर १० गुंठे............१२००...............९९ वर्षेजिल्हा सैनिक मुलांचे वसतिगृह..............२ एकर.....................५०००.................६० वर्षेजिल्हा सैनिक मुलींचे वसतिगृह..............२ एकर....................१०००...................६० वर्षेमहापालिका पाण्याची टाकी..................४ गुंठे.......................०१.......................९९ वर्षआदिवासी मुलांचे वसतिगृह...................३ एकर....................०१........................९९ वर्षेयशवंत वसतिगृह................................१० एकर १ गुंठे............१२०००.................९९ वर्षेयशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ.......२ एकर.......................०१.....................६० वर्षेस्पाेर्ट ॲथोरटी ऑफ इंडिया (साई)..........९९ एकर ७ गुंठे.......०१......................९९ वर्षेशासकीय विज्ञान संस्था..........................२५ एकर...................००.....................कायमस्वरूपी

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण