शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

पर्यटनाची राजधानी छत्रपती संभाजीनगरात तब्बल ७०० अंगणवाड्या उघड्यावर

By विजय सरवदे | Published: June 27, 2024 6:03 PM

गेल्या आर्थिक वर्षात फक्त ४५ इमारतीसाठीच प्रशासकीय मान्यता

छत्रपती संभाजीनगर : पर्यटनाची राजधानी असलेल्या जिल्ह्यात जवळपास ७०० अंगणवाड्यांचा कारभार उघड्यावरच चालत असून ही गोष्ट या जिल्ह्यासाठी फारसी भूषणावह नाही, अशी चिंता या क्षेत्रात काम करणाऱ्या अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, अंगणवाडी इमारत बांधकामासाठी शासनाने तरतूदच बंद केली आहे. त्यावर उपाय म्हणून जिल्हा नियोजन समितीकडून मिळणाऱ्या ३ टक्क्यांपैकी १ टक्का निधीतून गेल्या आर्थिक वर्षात जि. प. प्रशासनाने ४५ अंगणवाडी इमारतींना प्रशासकीय मान्यता दिली आहे. या आर्थिक वर्षात तर अजून तरतूदच मंजूर नाही. त्यामुळे उघड्यावर चालणाऱ्या अंगणवाड्यांचे इमारतींचे स्वप्न कधी पूर्ण होईल, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

जिल्ह्यात साडेतीन हजार अंगणवाड्या असून, यापैकी स्वत:ची इमारत नसलेल्या ७०० अंगणवाड्यांचे कामकाज समाजमंदिरे, शाळा खोल्या, भाड्याच्या खोलीत, तर काही समुदाय पंचायत कार्यालयांत चालते. अंगणवाड्यांच्या माध्यमातून बालके, स्तनदा माता, गरोदर मातांना पोषण आहार, लसीकरणाची सुविधा दिली जाते. कुपोषण निर्मूलन, तसेच बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणही अंगणवाड्यांच्या माध्यमातूनच दिले जाते. पूर्वी अंगणवाडी इमारत बांधकामासाठी शासनाकडून दरवर्षी निधीची तरतूद केली जात होती, पण मागील तीन वर्षांपासून बांधकामाचे लेखाशीर्षच बंद करण्यात आले आहे. त्यामुळे अंगणवाडी इमारतींचे बांधकाम लटकले आहे.जिल्हा नियोजन समितीमार्फत महिला व बालविकास विभागासाठी ३ टक्के निधीची तरतूद केली जाते. या निधीतून राज्य सरकारचा जिल्हा महिला व बालविकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जि.प.चा महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येकी १ टक्का निधी मिळतो. त्यानुसार जि.प.च्या वाट्याला येणाऱ्या ५ कोटी १५ लाखांच्या निधीतून जवळपास ४५ अंगणवाडी इमारत बांधकामांसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

विशेष म्हणजे, मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाचे औचित्य साधून गेल्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. त्या बैठकीत जि. प.च्या वतीने ७२३ अंगणवाडी इमारत बांधकामासाठी ८३.६४ कोटी आणि ११२० अंगणवाड्यांमध्ये वीज जोडणीसाठी ९.८५ कोटींचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र, त्यावर अजूनही निर्णयच झालेला नाही.अंगणवाडी इमारतींची सद्य:स्थिती

तालुका- एकूण अंगणवाड्या- इमारत नसलेल्या

छत्रपती संभाजीनगर- ४७४- ९६फुलंब्री- २७४- ६३

सिल्लोड- ४९३- ९६सोयगाव- १५०- २४

कन्नड- ५२३- ८८खुलताबाद- १७३- ३३गंगापूर- ४८४- १४६

वैजापूर- ३९१- ९८

पैठण- ४६२- ८१

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण