छत्रपती संभाजीनगर : सीएसएमटी स्थानकावरील कामासाठी घेण्यात येणाऱ्या ब्लाॅकमुळे ३१ मे ते २ जूनदरम्यान मुंबईला ये-जा करणाऱ्या ६ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. या रेल्वे रद्द होताच बुधवारी १,१२० रुपये भाडे असलेल्या ट्रॅव्हल्सचे भाडे १,७२० रुपयांवर गेले. इतर ट्रॅव्हल्सनेही २०० ते ३०० रुपयांची भाडेवाढ केली आहे. मुंबईचा प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे.
सीएसएमटी स्थानकावरील यार्ड आणि प्लॅटफाॅर्मच्या विस्तारासाठी नाॅन-इंटर लाॅक वर्किंग ब्लाॅक घेण्यात येत आहे. त्यामुळे काही रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमार्गे मुंबईला जाणाऱ्या रेल्वेंची संख्या अधिक आहे. त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी रेल्वेला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या अधिक आहे. परिणामी, मुंबईला जाणाऱ्या रेल्वे नेहमीच प्रवाशांनी भरून धावतात. सध्या उन्हाळी सुट्यांमुळे तर मुंबईला जाणाऱ्या रेल्वेंचे आरक्षणही मिळणे अवघड झाले आहे. उन्हाळी सुट्यांचे नियोजन करून प्रवाशांनी अनेक दिवस आधीच रेल्वेचे आरक्षण केले. मात्र, ३१ मे ते २ जूनदरम्यान मुंबईला ये-जा करणाऱ्या ६ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. या रेल्वे रद्द होताच या कालावधीत मुंबईला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचे भाडे वाढविण्यात आले आहे.
रद्द करण्यात आलेल्या रेल्वेरेल्वे - रद्द झालेली तारीख१) नांदेड - मुंबई तपोवन एक्स्प्रेस- ३१ मे आणि १ जून२) मुंबई - नांदेड तपोवन एक्स्प्रेस - १ व २ जून३) जालना - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस - १ व २ जून४) मुंबई - जालना वंदे भारत एक्स्प्रेस - १ व २ जून५) मुंबई - नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस- १ व २ जून६) नांदेड - मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस - ३१ मे व १ जून
असे वाढले मुंबईच्या ट्रॅव्हल्सचे भाडेबसची वेळ - २९ मे-३० मे- ३१ मे -१ जूनरात्री ८:१० वा.- १,१२० रु.-१,२२० रु.-१,५२० रु.-१,५२० रु.रात्री ९:१० वा. -१,१२० रु.-१,३२० रु.- १,७२० रु.-१७२० रु.रात्री ९:३० वा.-१,००० रु. - १,२२० रु.-१,५४० रु.- १,५२० रु.