शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

थंडी वाढताच वाढला महागड्या मोहरी, तीळ तेलाचा मसाजसाठी वापर; काय आहेत वैशिष्ट्य?

By प्रशांत तेलवाडकर | Published: December 28, 2023 1:36 PM

महागड्या मोहरी, तीळ तेलाचा शहरवासीय करतात वापर

छत्रपती संभाजीनगर : एरव्ही महाग-महाग म्हणून खरेदी न करणारे शहरवासीय आता थंडी वाढताच मोहरी (सरसो) व तीळ तेलाने मसाज करत आहेत. डोक्यापासून ते तळपायापर्यंत हे महागडे तेल लावून मसाज करीत आहेत. कारण, आरोग्याविषयी वाढलेली जागरुकता होय. थोडे जास्त रुपये खर्च झाले तरी चालेल; पण आपली त्वचा ही मुलायम राहावी हीच तर त्यांची भावना आहे.

परप्रांतीयांमुळे महिन्याला टन भर विकतेय तेलशहरात सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा असो वा करडई तेल यांचा वापर खाण्यासाठी करीत असतात. आपल्याकडे मोहरी व तिळाच्या तेलाची फोडणी दिली जात नाही. मात्र, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा या राज्यांत मोहरीच्या तेलाचा सर्वाधिक खप आहे. आपल्या शहरात नोकरी-उद्योगधंद्याच्या निमित्ताने परप्रांतीय मोठ्या संख्येने राहण्यास आले आहेत. या परप्रांतीयांच्या मागणीमुळे शहरात महिन्याकाठी १ टनापेक्षा अधिक मोहरी व तीळ तेल विकले जाते. थंडीच्या दिवसात मोहरी व तीळ तेलाची विक्री २५ ते ३० टक्क्यांनी वाढते.- जगन्नाथ बसैये, व्यापारी

तेलाचे काय भाव ?प्रकार किंमत (प्रति लिटर)मोहरी तेल १६० रुतीळ तेल २०० रु

मसाजसाठी मोहरीचे तेलच का ?मोहरीचे तेल केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचा आणि केसांच्या देखभालीसाठीही पोषक आहे. चेहरा निस्तेज किंवा त्वचा कोरडी दिसत असेल तर हे तेल त्वचेसाठी अतिशय प्रभावी ठरू शकते. मोहरीच्या तेलामुळे त्वचेला नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराइझर मिळते. यामुळे त्वचेचा ओलावा टिकून राहण्यास मदत होते. मजबूत केसांसाठी तेलाचा वापर केला जातो. यात व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अन्य पोषक घटक असतात.

तीळ तेलाचे फायदेतीळ तेलात मिनरल्स, ओमेगा फॅटी ॲसिड अशी शरीराला उपयोगी ठरणारी पोषणद्रव्ये आढळतात. तिळाच्या तेलाच्या सेवनाने रक्तातील बॅड कोलेस्ट्रेरॉल कमी होते व आवश्यक कोलेस्टेरॉल वाढते, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि कॅल्शियम आढळते. यामुळे हृदयाचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. थंडीत मसाजसाठी तीळ तेलाचा वापर केला जातो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सAurangabadऔरंगाबादMarketबाजार