छत्रपती संभाजीनगर : दर महिन्याला महागाईचा आकडा एवढा फुगत आहे की, सध्यापेक्षा पाठीमागील दिवस बरे होते, असे म्हणण्याची वेळ आली आहे. कांद्यापासून ते कडधान्य, डाळीपर्यंत सर्वांचे भाव वाढले आहेत. पण या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही.
कोरड्या दुष्काळाच्या नावाखाली ही महागाई कोण वाढवत आहे, कोणाची यात चांदी होत आहे, हा स्वतंत्र विषय आहे. मात्र, याचा अंतिम फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे, हे तेवढेच सत्य. हॉटेलची थाळी महाग असतेच; पण आता घरी जेवण बनविणेही तसेच महाग पडत आहे.
४०० रुपयांनी वाढला महिन्याचा खर्चवार्षिक धान्य खरेदी करणारे यंदा फायद्यात राहिले आहे. कारण, मार्च महिन्यातील धान्य, कडधान्य, डाळीच्या भावात व ऑगस्टमधील भावात ४० टक्क्यांपर्यंत फरक पडला आहे. किराणा दुकानदाराकडे येणाऱ्या किराणाची यादी पाहिल्यास सर्वसाधारणपणे चारजणांच्या कुटुंबास महिन्याला अडीच हजारांचे सामान लागत असे. ते आता २,९०० रुपयांपर्यंत लागते.
पाऊस न पडल्याने त्याचे होतेय भांडवलपाऊस न पडल्याने दुष्काळसदृश परिस्थिती आहे. भविष्यातील पिकांची शाश्वती नाही. मल्टिनॅशनल कंपन्या, मॉल, डाळमिलवाले यांच्याकडे मोठ्या प्रमाणात साठा आहे. तेच भाववाढ करून चांदी करून घेत आहेत. मात्र, यात व्यापारी बदनाम होत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला.
मागील महिना बरा होतामहिन्याचा किराणाचे बिल मागील महिन्यापेक्षा ४०० ते ५०० रुपये वाढून येत आहे. विशेष म्हणजे सामान तेवढेच असते. मागील महिना बरा होता, असे म्हणावे लागत आहे. हॉटेलचे जेवण दूरच; तेथे चार ते पाच महिन्यांतून एकदा आम्ही जातो, पण आता घरी जेवण बनविणेही महाग पडत आहे.- भक्ती चिकलठाणकर, गृहिणी
जून महिन्याच्या तुलनेत किती महागले?प्रकार जूनचे दर सध्याचे दरकांदा २० रु. ३० रु.तूरडाळ १०० रु. १५५ रु.हरभरा डाळ ६४ रु. ८० रु.गहू ३२ रु. ३४ रु.ज्वारी ४० रु. ४८ रु.शेंगदाणा ११० रु. १४० रु.साबुदाणा ७० रु. ८४ रु.