शुक्रवारी सायंकाळी चारच्या ऐवजी ही पत्रपरिषद ५ वाजता सुरू झाली. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने होणार अशी कुणकुण आधीच पोलिसांना लागली होती. त्यानुसार पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता. पत्रपरिषदेत पत्रकारांशिवाय कुणालाही आत सोडले जात नव्हते. बाहेरच गेस्ट हाऊसच्या आवारात ही निदर्शने झाली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व त्यांची रवानगी बेगमपुरा पोलीस ठाण्यात केली. यावेळी निदर्शकांनी जीआर फाडले. ‘मुख्यमंत्री हाय हाय’, अशोक चव्हाण समिती पदाचा राजीनामा द्या अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील, आप्पासाहेब कुढेकर पाटील, राहुल पाटील, पंढरीनाथ गोडसे पाटील, भरत कदम पाटील, गणेश उगले पाटील, दिव्या पाटील, जयश्री दाभाडे यांच्यासह मराठा समन्वयक उपस्थित होते.
अशोकराव चव्हाण यांच्या पत्रपरिषदेत गोंधळ घालण्याचा डाव उधळला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:05 AM