शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाचे थैमान, हाताशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 5:08 PM

चांगली वाढ झालेली पिके संकटात आल्याने बळीराजाचे दु:ख काही संपत नाही, अशी स्थिती आहे.

- नितीन कांबळे कडा (बीड) : आष्टी तालुक्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. मागिल आठ दिवसांपासून रोज पाऊस पडत आहे. आज सकाळी तर पांढरी, करंजी, पांगुळगव्हाण, क-हेवडगांव, क-हेवाडी, मातकुळी, वनवेवाडी, पोखरी, हाजीपुर या परिसरास ढगफुटी सदृश्य पावसाने अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे नदी-नाल्यांना पुर आल्याने वाहतूक ठप्प आहे. अनेक  गावांचा संपर्क देखील तुटला आहे. ग्रामस्थ, विद्यार्थी, नौकरदार, दुध उत्पादक शेतकरी पावसामुळे घरातच अडकून पडले आहेत. 

आष्टी महसूल मंडळ परिसरात आज सकाळी 9 वाजेपासून मुसळधार पाऊस सुरु झाला. शेतक-यांचे अतोनात नुकसान झालं शेतांना तळ्यांचे स्वरुप प्राप्त झाल्याने सोयाबीनला कोंब येण्याची भीती आहे. कापुस,कांदा,तुर पीक शेतात झोपल्याने झडण्यासह पाण्यात कुजण्याची भीती आहे. चांगली वाढ झालेली पिके अशा पद्धतीने संकटात आल्याने बळीराजाचे दु:ख काही संपत नाही, अशी स्थिती आहे.

सोलेवाडीचा पुल तुटल्याने 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला तालुक्यातील सोलेवाडी येथील नगर जिल्ह्यातील गावांना जोडणारा पुल परतीच्या पावसाने वाहुन गेला आहे. सकाळपासून पूर आल्याने या मार्गावरील जामगांव, देविगव्हाण, वाळुंज, डोणगांव, अरणगांव, पारेवाडी, या गावातील विद्यार्थी, नौकरदार, नागरिक वाहतूक दुपारपर्यंत ठप्प आहे. या गावांचा संपर्क तुटला आहे. 

पांढरी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस सकाळपासूनच पांढरी परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले असून गावातील शेतकर्‍यांनी कांदा, ज्वारी पिकाची पेरणी केली आहे. व कापुस तुर, कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. सर्व पिके पाण्यात असून जमिन खोदून गेली आहे. बळीराजाचे आस्मानी संकटाने अतोनात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांना तात्काळ पंचनामे करून मदत ही दिवाळी पूर्वी द्यावी जेणेकरून बळीराजाची हि दिवाळी गोड होईल.– सुधिर पठाडे (सरपंच, पांढरी)

विमा कंपनीने स्वत: पंचनामे करावेत-आ.धसपरतीच्या पावसामुळे आष्टी तालुक्यातल्या काही मंडळात प्रचंड नुकसान झाले आहे. जमिनी खरडून वाहून गेल्या आहेत. प्रशासन यावर नजर ठेवून असली तरी पुढचे काही दिवस पंचनाम्याला जातील. खरिपाचे पिक हातातून गेल्याचे सांगत विमा कंपनी शेतकर्‍यांना नुकसानीचे फोटो अपलोड करायला सांगते परंतू शेतकर्‍यांना ते जमत नाही. त्यामुळे स्वत: कंपनीने या भागात येवून पंचनामे करत अपलोड करावे. अशी मागणी आ.सुरेश धस यांनी केली.

टॅग्स :BeedबीडRainपाऊसFarmerशेतकरी