लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: घाईघाईने सुरु केलेल्या जीएसटीमुळे शहरातील व्यापार संकटात आला आहे. तर नोटबंदीमुळे अनेकांना नोकºयांना मुकावे लागले असून गरीब, कष्टकºयांचा घामाचा पैसा या माध्यमातून सरकारने काढून घेतला आहे. दुसरीकडे महागाईचा आगडोंब उसळला आहे. सणासुदीच्या काळात सरकारने रेशनवर मिळणारी साखरही बंद करुन टाकली आहे. सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील करणाºया या निर्णयांचा जाब विचारण्याची संधी महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून आली आहे. त्यामुळे इथे कमळ, तिथे कमळ असा प्रचार करणाºया भाजपाच्या निशाणी कलम करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ सोमवारी जुन्या नांदेडातील चौफाळा येथील निरंजन आश्रम शिवमंदिरामध्ये करण्यात आला. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, खा. चव्हाण, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. शरद रणपिसे, आ.डी.पी. सावंत, आ. अमरनाथ राजूरकर, माजी आ. विजय खडसे, महापौर शैलजा स्वामी, माधवराव पाटील जवळगावकर, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, उपमहापौर शफी अहेमद कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर झालेल्या सभेत खा. चव्हाण यांनी जुन्या नांदेडातील शेषेप्पा राखेवार, अमिन कुरेशी या जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यांची आठवण केली. या भागातील जनतेने शंकरराव चव्हाणांपासून काँग्रेसला साथ दिली आहे. या भागातील जनतेने काँग्रेसवर टाकलेल्या विश्वासाला आपण कधीही तडा जाऊ देणार नसल्याचे ते म्हणाले. तीन वर्षांपूर्वी ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने कुणाचे अच्छे दिन आणले, असा प्रश्न त्यांनी केला. पेट्रोलचे भाव ८१ रुपयांवर पोहोचले आहेत.रेशन दुकानावर मिळणारी साखरही बंद करण्यात आली आहे. महाराष्टÑ आत्महत्या करण्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आला आहे. ही बाबच राज्याची परिस्थिती निदर्शनास आणते. त्यामुळे नांदेडात कमळ फुलवण्याचे स्वप्न पाहणाºया भाजपाचे कमळ नांदेडमध्ये कलम करा, असे आवाहनही त्यांनी केले. भाजपाला एमआयएमकडून साथ दिली जात आहे. मुस्लिम मताच्या विभागणीतून धर्मांध शक्तीला सत्तेवर आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तो प्रयत्न हाणून पाडण्याची गरज आहे. भाजपाकडे आज नेता नाही. शिवसेनेचा आमदार भाजपा पक्ष चालवित आहे. या पक्षाचा जाहीरनामा हा केवळ अशोकराव चव्हाणांना शिव्या देणे हाच आहे. भाजपाकडे मूळ कार्यकर्तेही राहिले नसून काळे धंदे लपविण्यासाठीच प्रवेश केलेली मंडळी आता भाजपातून पुढे येत आहे.देशासाठी महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी दिलेले योगदान लपवून देशाचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न भाजपा करीत आहे. दिनदयाल उपाध्याय यांना पुढे आणले जात आहे. भाजप सरकार गांधींचे नाव पुस्तकातून काढून टाकत असले तरी प्रत्येकाच्या मनात असलेल्या काँग्रेसला दूर कसे करणार, असा सवालही त्यांनी केला. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयात राष्टÑवादी काँग्रेसची घड्याळ १० वाजून १० मिनिटांनी बंदच पडल्याची टीकाही त्यांनी केली.आ. रणपिसे यांनी मतांची विभागणी करण्यासाठी एमआयएम, बहुजन विकास आघाडी असे प्रयोग होत आहेत. त्यांना जनता थारा देणार नसल्याचे सांगितले. आ. सावंत यांनी मनपा निवडणूक प्रचारात राज्यात अनेक ठिकाणी पॅकेजची घोषणा केली मात्र तीन वर्षांनंतरही एक छदामही तेथे पोहोचला नाही. नांदेडमध्ये अशा पॅकेजच्या घोषणा होतील. मात्र भाजपासारख्या फेकू पक्षावर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन केले़ आ. राजूरकर यांनी या निवडणुकीत एमआयएमला भाजपा चालवित असल्याचा आरोप केला. स्मार्ट सिटी योजनेत नांदेडला ५८ टक्के गुण मिळूनही केवळ आकसापोटी भाजपा सरकारने नांदेडचा समावेश केला नाही.कार्यक्रमास गंगाधर सोंडारे, सुमती व्याहाळकर, नारायण श्रीमनवार, संतोष पांडागळे, मंगला धुळेकर, अनिता हिंगोले, पुष्पाताई शर्मा, कविता कळसकर, माजी महापौर प्रकाश मुथा, सतीश राखेवार, लक्ष्मीकांत गोणे, प्रल्हाद सुरकुंटवार, गोविंद पोपूलवार,अमित काबरा, गंगाप्रसाद काकडे, शहाजी नळगे, मनान चौधरी, एकनाथराव दासरवार, शिवानंद चमेवार, अॅड. सिद्दीकी, प्रल्हाद कोकुलवार, अंबादास रातोळे, राधेश्याम राखेवार, अशोक पट्टेकर यांची उपस्थिती होती़
जीएसटी,नोटाबंदी,महागाईचा जाब विचारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:25 AM