शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

शहरातील मालमत्तांचे होणार फेरमूल्यांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 12:49 AM

शहरातील मालमत्तांचे २०१८-१९ मध्ये महापालिका फेरमूल्यांकन करणार असून त्यानुसार मालमत्ताधारकांकडून करवसुली केली जाणार आहे. दरम्यान, चालू वर्षाची करवसुली करण्यासाठी महापालिकेने शुक्रवारपासून विशेष मोहीम सुरु केली आहे. तब्बल दीडशे कोटींच्या करवसुलीचा डोंगर महापालिकेपुढे उभा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शहरातील मालमत्तांचे २०१८-१९ मध्ये महापालिका फेरमूल्यांकन करणार असून त्यानुसार मालमत्ताधारकांकडून करवसुली केली जाणार आहे. दरम्यान, चालू वर्षाची करवसुली करण्यासाठी महापालिकेने शुक्रवारपासून विशेष मोहीम सुरु केली आहे. तब्बल दीडशे कोटींच्या करवसुलीचा डोंगर महापालिकेपुढे उभा आहे.शहरात आजघडीला १ लाख ११ हजार मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडे जवळपास १५६ कोटी रुपये थकले आहेत. त्यामध्ये चालू वर्षाची थकबाकी ५६ कोटी रुपये आहे. महापालिकेकडून अनधिकृत बांधकाम शास्ती आणि थकबाकीवरील शास्ती मालमत्ताधारकांकडून वसूल केली जात आहे. या शास्तीच्या रकमेबाबत अनेक मालमत्ताधारकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे ही शास्तीची रक्कम वसूल करणे मोठे आव्हान महापालिकेपुढे उभे आहे. अनधिकृत बांधकाम शास्तीपोटी २० कोटी ११ लाख आणि थकबाकीवरील शास्तीपोटी ४० कोटी रुपये महापालिकेला वसूल करावे लागणार आहेत. महापालिकेने १ एप्रिल २०१७ पासून आॅक्टोबर अखेरपर्यंत ११ कोटी ३० लाख रुपयांची करवसुली केली आहे. आगामी पाच महिन्यांच्या काळात जवळपास ८० कोटी रुपये महापालिकेला वसूल करावे लागणार आहेत. चालू वर्षाची थकबाकी ही ५६ कोटींची असली तरी यापूर्वीची थकबाकी ही १०० कोटी आहे. या १०० कोटींमध्ये ५० कोटी रुपये बांधकाम शास्ती तसेच थकबाकीवरील शास्ती आणि चालू वर्षातील ५६ कोटींपैकी १२ कोटी रुपये बांधकाम व थकबाकीवरील शास्तीपोटीचा कर आहे. मालमत्ताधारकांकडून करवसुलीसाठी मनपाने आतापासूनच पाऊले उचलली असून विशेष मोहीमही सुरु केली आहे. त्याचवेळी महापालिकेने शहरातील मालमत्तांचे फेरमूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी महापालिकेने शहरातील मालमत्तांचे फेरमूल्यांकन २०११-१२ मध्ये केले होते. या मूल्यांकनानंतर कर आकारणीची अंमलबजावणी २०१३-१४ पासून केली होती. आता २०१८-१९ मध्ये मालमत्तांचे फेरमूल्यांकन करुन कर निर्धारण केले जाणार आहे. तत्पूर्वी महापालिकेने चालू वर्षाची तसेच थकित असलेली करवसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. वसुली मोहिमेसंदर्भात महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी वसुली लिपिक तसेच क्षेत्रीय अधिकाºयांची बैठक घेतली. मार्चअखेरपर्यंतची वाट न पाहता आतापासून मालमत्ताधारकांकडून करवसुलीसाठी प्रयत्न केल्यास मार्च अखेरपर्यंत ती पूर्ण होईल, असे स्पष्ट केले.