औरंगाबाद : दी औरंगाबाद जिल्हा खो-खो संघटनेतर्फे राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून विशेष ठसा उमटवणाºया औरंगाबाद येथील खेळाडूंचा शनिवारी सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्र्तींमध्ये आरती गंडे, अजय पवार, ज्योती मुकाडे, मयुरी पवार, रेणुका मोकासे यांचा समावेश होता. सिद्धनाथ वाडगाव येथील न्यू हायस्कूल येथील आरती गंडे हिने सांगली जिल्ह्यातील आष्टी येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते, तर राजेसंभाजी भोसले सैनिकी शाळेचा विद्यार्थी अजय पवार याने मध्यप्रदेशात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या १७ वर्षांखालील मुलांच्या महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याचप्रमाणे दिल्ली येथे होणाºया ‘खेलो इंडिया’ स्पर्धेसाठी धर्मवीर संभाजी विद्यालयाची ज्योती मुकाडे, मयुरी पवार यांची निवड झाली आहे. विवेकानंद महाविद्यालयाची विद्यार्थिनी रेणुका मोकासे हिने हैदराबाद येथील फेडरेशन चषक खो-खो स्पर्धेत विजेतेपद पटकावणाºया महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या सर्व खेळाडूंचा सत्कार दी औरंगाबाद जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष सचिन मुळे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी प्रशिक्षक संजय मुंढे व उमाकांत शिराळे यांचाही गौरव करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे सचिव गोविंद शर्मा उपस्थित होते.
संघटनेतर्फे राष्ट्रीय खो-खो खेळाडूंचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 1:04 AM