औरंगाबाद : विद्यापीठ परिसरातील ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्रात मराठवाड्यातील पहिले आॅलिम्पिक शैलीचे अॅस्ट्रो टर्फ हॉकी मैदानाचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. या मैदानावर अॅस्ट्रो टर्फच्या सर्वच स्ट्रीप्स लावण्यात आल्या आहेत. यासाठी पेव्हरब्लॉक, लाईट आदी आवश्यक सुविधांचे थोडेच काम बाकी राहिले आहे. हे काम लवकरच पूर्णत्वास येणार असल्यामुळे मराठवाड्यातील प्रतिभावान खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ठरू शकणाºया अॅस्ट्रो टर्फ हॉकी मैदानावर खेळण्याचे स्वप्न आता लवकरच साकार होणार आहे.तब्बल ६ कोटी रुपये खर्च लागलेल्या साईच्या पश्चिम विभागीय केंद्रातील रिओ आॅलिम्पिकच्या धर्तीवर असणारे निळ्या रंगाचे अॅस्टर्फ हॉकी मैदानाचे १४ जून २०१६ रोजी भूमिपूजन झाले होते. त्यानंतर सर्वात प्रथम हे मैदान लेव्हलिंग करण्यात आले. त्यानंतर माती, दगडाचे छोट-छोटे तुकडे, डांबर, रबर शॉकपॅड आदींचे थर मैदानावर लावण्यात आले होते. टर्फ लावण्याआधी ग्लू केमिकलचा स्प्रे मारून टर्फ चिकटवण्यात आले होते. या कामासाठी आॅस्ट्रेलियातून दोन जणांचे पथक आले होते. त्याचप्रमाणे मैदानाभोवती फेन्सिंग करण्यात आले आहे. तसेच एक लाख लिटर पाण्याची क्षमता असणारे वॉटर टँक उभारण्यात आले असून, तेथून पाईपलाईनद्वारे अॅस्ट्रो टर्फवर स्प्रिंकलरद्वारे पाणी दिले जाणार आहे. या टर्फ मैदानावर एकूण सहा स्प्रिंकर्ल्स असणार आहेत. स्प्रिंकलरद्वारे अॅस्ट्रो टर्फवर पाणी फवारल्यानंतर अवघ्या दहाच मिनिटांत त्यावर खेळता येणार आहे. तथापि, येथे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धा पाहण्याचा आनंद लुटण्यासाठी औरंगाबादकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण सध्या तरी या मैदानावर प्रेक्षागृह उभारण्यात आलेले नाही. तेही आगामी काळात होईल, असा विश्वास ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी व्यक्त केला आहे.फेब्रुवारी महिन्यातच उद्घाटनअॅस्ट्रो टर्फ हॉकी मैदानाचे पेव्हर ब्लॉकचे काम बाकी आहे. ते आगामी काही दिवसांतच पूर्ण होईल. तसेच मैदानाभोवती असणाºया वॉल पेंटिंगचेही काम सुरू आहे. पॅव्हेलियनही उभारावयाचे आहे. १५ फेब्रुवारीनंतरच या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अॅस्ट्रो टर्फ हॉकी मैदानाचे उद्घाटन होईल. यासाठी क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोडसह अनेक दिग्गजांना आणण्याचा प्रयत्न असणार आहे, असे साईच्या पश्चिम विभागीय केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
‘साई’ केंद्रातील अॅस्ट्रो टर्फचे काम पूर्णत्वाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 1:03 AM
विद्यापीठ परिसरातील ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्रात मराठवाड्यातील पहिले आॅलिम्पिक शैलीचे अॅस्ट्रो टर्फ हॉकी मैदानाचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. या मैदानावर अॅस्ट्रो टर्फच्या सर्वच स्ट्रीप्स लावण्यात आल्या आहेत. यासाठी पेव्हरब्लॉक, लाईट आदी आवश्यक सुविधांचे थोडेच काम बाकी राहिले आहे. हे काम लवकरच पूर्णत्वास येणार असल्यामुळे मराठवाड्यातील प्रतिभावान खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ठरू शकणाºया अॅस्ट्रो टर्फ हॉकी मैदानावर खेळण्याचे स्वप्न आता लवकरच साकार होणार आहे.
ठळक मुद्देप्रतीक्षा उद्घाटनाची : मराठवाड्यातील खेळाडूंना मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॉकी मैदानावर खेळण्याची संधी