शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

वयाच्या चौदाव्या वर्षीच मुलं प्रेमप्रकरणातून सोडताहेत घरे; पालक, पोलिसांच्या चिंतेत वाढ

By सुमित डोळे | Published: July 06, 2023 1:28 PM

छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा महिन्यांमध्ये १३४ मुले गेली पळून; कुटुंबात विसंवाद, सोशल मीडियाचा वाढता वापर मुख्य कारण, वाळूज औद्योगिक वसाहतीत मुली, महिला पळून जाण्याचे प्रमाण सर्वाधिक

छत्रपती संभाजीनगर: १६ वर्षांची साक्षी (नाव बदलले आहे)चे आई वडील दिवसभर नोकरीनिमित्त बाहेर असायचे. शाळेनंतर तिचा बहुतांश वेळ सोशल मीडियावर जायचा. त्यातून तिची भुवनेश्वरच्या मुलासोबत ओळख झाली आणि साक्षीने अवघ्या महिनाभराच्या ओळखीवर घर सोडून भुवनेश्वर गाठले. गुजरातच्या अहमदाबादहून अशाच पंधरा वर्षांच्या मुलीने एकतर्फी प्रेमातून थेट छत्रपती संभाजीनगर गाठत पोलिसांना प्रियकर शोधून देण्याची मागणी केली. अशा एक-दोन नाही तर गेल्या साडेतीन वर्षांमध्ये तब्बल ५०१ बालकांनी घर सोडले. यात ८० टक्के मुली असून त्यातही प्रेमप्रकरणातून घर सोडण्याचे वय १४ व्या वर्षांपर्यंत खाली आले आहे. या साडेतीन वर्षांच्या तुलनेत २०२३ जूनपर्यंतच १३४ बालकांनी घर सोडले. त्यात ९५ मुली असल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या अहवालातून समोर आली आहे.

काबाडकष्ट करून वाढवणाऱ्या आई-वडिलांपेक्षा सध्या मुला-मुलींना आभासी जगातील मित्र, मैत्रिणी, प्रियकर अधिक महत्त्वाचे वाटू लागले आहेत. यात सर्वाधिक प्रमाण मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे आहे. त्यांना पळवून नेणारे मोठे असतात. परंतु, कमी वयातील असमज, आकर्षण, वेब सिरीज, मोबाइल व सोशल मीडियाच्या अति वापरामुळे मुलांमधील सहनशीलता संपत चालली आहे, असे स्पष्ट निरीक्षण पाेलिस नोंदवतात. आई, वडील नोकरीत व्यस्त असतात. कुटुंबात संवाद साधण्यासाठी कोणीही नसल्याने अल्पवयीन मुली निरनिराळ्या आमिषांना बळी पडतात. मित्राकडून, प्रियकराकडून ती पोकळी भरली जात असल्याचा भास त्यांना होतो व क्रमाने घर सोडण्याच्या निर्णयापर्यंत त्या येऊन थांबतात. या सगळ्यात पालकांच्या पदरी मात्र मन:स्ताप येतो. अल्पवयीन असल्याने मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. कायद्याने देखील त्यांचे लग्न बेकायदेशीर ठरते आणि पुढील अनेक महिने दोन्ही कुटुंबांच्या मागे कायद्याचा ससेमिरा लागतो. हे प्रकार थांबवण्यासाठी पोलिसांकडून आता शाळाशाळांमध्ये जाऊन प्रबोधन सुरू आहे.

तीन वर्षांत २०२३च्या सहा महिन्यात सर्वाधिकपोलिसांच्या अहवालानुसार, गेल्या तीन वर्षांमध्ये २०२३च्या जानेवारी ते जूनमध्ये सर्वाधिक मुले पळून गेली. यात १३४ एकूण मुलांमध्ये ३९ मुले तर ९५ मुली आहेत. अल्पवयीन असल्याने यात भादंवि ३६३ नुसार त्यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होऊन उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे तपास दिला जातो.२०२०             २०२१             २०२२ २०२३ (जूनपर्यंत)दाखल/उघड दाखल/उघड दाखल/उघड दाखल/उघड९७/८६             ११२/१०८ १५८/१४४ १३४/८९

वाळुज औद्योगिकमध्ये प्रमाण अधिकमुली, महिला पळून जाण्याचे प्रमाण वाळुज औद्योगिक वसाहतीमध्ये सर्वाधिक आहे. २०२३ जुन पर्यंत ३२ मुली पळून गेल्याची नोंद आहे. त्या खालोखाल सिडको, पुंडलिकनगर व मुकुंदवाडी पोलिस ठाण्यातील परिसर आहेत.

२४ मुलांचा शोध सुरू२०२३ मध्ये पळून गेलेल्या मुलांमध्ये १३४ पैकी अद्यापही २४ मुला, मुलींचा शोध सुरू आहे. यात २० मुली तर चार मुलांचा समावेश आहे.

यांना शोधणे मोठे आव्हानपाेलिस ठाण्याच्या पातळीवर चार महिन्यांमध्ये अशा मुलांचा शोध लागला नाही तर त्याचा विशेष व वेगाने तपास होण्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे (एएचटियू) दिला जातो. २०२१ मध्ये त्यांनी प्राप्त १७ गुन्ह्यांपैकी १४ बालकांचा तर २०२२ मध्ये ११ बालकांमध्ये ९ बालकांचा यशस्वी शोध लावून कुटुंबाच्या स्वाधीन केले. पोलिस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त अपर्णा गिते यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शिवाजी तावरे, सहायक निरीक्षक सुषमा पवार, सहायक फौजदार ईसाक पठाण, हेड कॉन्स्टेबल डी. डी. खरे, संताेष त्रिभुवन, बाबासाहेब राठोड, हिरा चिंचोलकर व अमृता काबलीये यांचे पथक सातत्याने अशा बालकांचा शोध घेण्यासाठी कष्ट घेत आहेत.

नंतर चुकीची जाणीव होतेमुलींचे घर सोडण्याचे प्रमाण तुलनेने वाढले आहे. यात प्रेमप्रकरणातून पळून जातात. कायद्याची जाण नसते. परंतु पालकांपेक्षा प्रियकर महत्त्वाचा वाटतो. यात १४व्या वर्षापर्यंत हे प्रमाण आले आहे. पालकांनी मुलांशी योग्य व सातत्याने संवाद वाढवावा, संवेदनशील विषयांवर आई किंवा वडिलांनी खुलेपणाने बोलावे, समजून सांगितल्यास असे प्रकार टाळता येतील. सुषमा पवार, सहायक निरीक्षक, एएचटीयू विभाग.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादKidnappingअपहरण