शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

जामीन मिळताच अट्टल चोरटा पुन्हा सक्रीय; २४ तासातच घरफोडीच्या गुन्ह्यात झाला गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 7:15 PM

चोरट्याने गुंह्याची कबुली देत अल्पवयीन साथीदारासोबत ही घरफोडी केल्याचे सांगितले

ठळक मुद्देआरोपी गयब्या उर्फ आकाश हा बालपणापासून चोऱ्या करतो . उस्मानपुरा पोलिसांनी पंधरा दिवसापूर्वी त्याला अटक केली होती

औरंगाबाद: चोरी घरफोडीच्या गुंह्यात न्यायालयाने जामीनवर सोडल्यानंतर अवघ्या २४ तासांत सातारा परिसरात घरफोडी करून लाखाची सोन्याचांदीचे दागिने पळविणाऱ्या अट्टल चोरट्याला सातारा पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून चोरीचा सर्व ऐवज पोलिसांनी जप्त केला.

आकाश उर्फ गयब्या ( रा . छोटा मुरलीधरनगर )असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे . याविषयी पोलिसांनी सांगितले की  सातारा परिसरातील रहिवासी प्रियंका पांडूरंग कुदळे या २ रोजी रात्री सहपरिवार बेड रुममध्ये झोपल्या होत्या . चोरट्यानी त्यांच्या घराचे दाराची कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला . हॉल मध्ये ठेवलेल्या लोखंडी कपाट उघडून त्यांनी त्यातील सोन्याची एक तोळ्याची पोत , ५ ग्रॅमचे झुंबर , ३ ग्रॅम चे मंगळसूत्र, चांदीचे वाळे , चांदीचे पैंजण असा सुमारे ८० हजाराचा ऐवज चोरुन नेला होता . दुसऱ्या दिवशी सकाळी घरात चोरी झाल्याचे   नजरेस पडल्यानंतर त्यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाले यांच्या मार्गदर्शनाखाली डी . बी . पथकाचे  उपनिरीक्षक विक्रम वडणे , कर्मचारी प्रदीप ससाणे , सानप , मांडे पाटिल यांच्या पथकाने तपास करून घटनेनंतर अवघ्या काही तासांत संशयित आरोपी आकाश उर्फ गयब्या ला ताब्यात घेतले . त्याची कसून चौकशी केली असता . गयब्याने गुंह्याची कबुली देत अल्पवयीन साथीदारासोबत ही घरफोडी केल्याचे सांगितले . चोरी केलेला माल घरात लपवून ठेवल्याचे सांगितले . पोलिसांनी पंचासमक्ष प्रियांका यांच्या घरातून चोरी झालेला सर्व ऐवज जसेच्या तसे जप्त केले . 

आरोपी गयब्या अट्टल घरफोड्या आरोपी गयब्या उर्फ आकाश हा बालपणापासून चोऱ्या करतो . आताही तो घरफोडी करताना अल्पवयीन मुलांना सोबत घेतो . चोरी करुन मिळालेल्या पैशातून साथीदार मुलांसोबत नशापाणी करतो . उस्मानपुरा पोलिसांनी पंधरा दिवसापूर्वी त्याला अटक करून किराणा दुकान , मोबाईल शॉपी , कापड दुकान आणि औषधी दुकान फोडल्याची गुन्हे उघडकीस आणली होती . या गुंह्यात न्यायालयाने त्याला जामीनवर सोडल्यानंतर त्याने घरफोडी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस