औरंगाबाद : अवघ्या चार वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या साठ वर्षांच्या वृद्धाला विशेष सत्र न्यायाधीश एस. एस. भीष्मा यांनी दहा वर्षे सश्रम कारावासासह विविध कलमांखाली एकूण दहा हजार रुपये दंड ठोठावला. दंडाच्या रकमेपैकी पाच हजार रुपये पीडित मुलीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशात म्हटले आहे.९ मार्च २०१५ रोजी सदर मुलगी तिच्या घराजवळ खेळत होती. सातारा गावातील राजू विश्वनाथ साबळे (६०) हा तेथे आला. त्याने त्या मुलीला एक रुपया दिला आणि ‘चल तुला खेळ दाखवितो’ असे म्हणत एका वाड्यातील शौचालयात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलगी जोरात ओरडल्यामुळे राजूने मुलीचे तोंड दाबले. घराच्या गच्चीवर गहू वाळत घालणाºया महिलेने आवाज ऐकला. तिने ही बाब नागरिकांना सांगितली. लोकांनी राजूच्या तावडीतून मुलीची सुटका करून त्याला चोप दिला. मात्र राजू पळून केला.मुलीच्या आईच्या तक्रारीवरून सातारा पोलीस ठाण्यात राजू साबळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाणीत जखमी झालेल्या राजू साबळेला १ एप्रिल २०१५ रोजी घाटी रुग्णालयातून ‘डिस्चार्ज’ झाल्यानंतर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.खटल्याच्या सुनावणीच्या वेळी सहायक लोकअभियोक्ता मधुकर आहेर यांनी दहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने राजूला भादंवि कलम ३७६ अन्वये १० वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला. तसेच कलम ३२३ अन्वये सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा दिली. त्याचप्रमाणे बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ व ४ नुसार १० वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला. याच कायद्याच्या कलम ८ अन्वये तीन वर्षे सश्रम कारावास ठोठावला. दंडाच्या रकमेपैकी पाच हजार रुपये पीडित मुलीला नुकसानभरपाईपोटी देण्याचे आदेशात म्हटले आहे.
चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न; साठ वर्षांच्या वृद्धाला दहा वर्षे सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 10:52 PM
अवघ्या चार वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या साठ वर्षांच्या वृद्धाला विशेष सत्र न्यायाधीश एस. एस. भीष्मा यांनी दहा वर्षे सश्रम कारावासासह विविध कलमांखाली एकूण दहा हजार रुपये दंड ठोठावला.
ठळक मुद्दे बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भादंविच्या विविध कलमांखाली शिक्षा