लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या सतर्कतेमुळे औद्योगिकनगरीत दरोडेखोरांचा प्रयत्न फसला. रांजणगाव शिवारात रविवारी मध्यरात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ४ दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले. मुख्य सूत्रधारासह ६ दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. या दरोडेखोरांच्या ताब्यातून एअरगन, तलवारीसह दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले.रविवारी मध्यरात्री वाळूज एमआयडीसीतील आकार टूल कंपनीच्या मागील बाबुराव हिवाळे यांच्या शेतवस्तीवजळ काही संशयित लपून बसल्याची माहिती खब-याने पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना दिली. त्यावरून फौजदार अमोल देशमुख, पोहेकॉ. वसंत शेळके, पोेहेकॉ. कारभारी सेवरे, पोना. गायकवाड, सुधीर सोनवणे, पोकॉ. राजकुमार सूर्यवंशी, मनमोहन कोलिमी, गोरे आदींच्या पथकाने सापळा रचून परिसराची चोहोबाजूने नाकाबंदी केली.पोलिसांची चाहूल लागताच संशयित इसम पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी चौघांना पकडले. अन्य ६ संशयित अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.सर्वच दरोडेखोर वाळूज परिसरातील रहिवासीचौघा दरोडेखोरांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी टोळीचा मुख्य सूत्रधार शेख शेरू (वाळूज) हा भंगारवाला असल्याचे सांगितले. शेख शेरूसोबत त्याचे साथीदार रऊफ (पूर्ण नाव माहीत नाही), भूतनाथ खरात, विठ्ठल ऊर्फ भावड्या खरात, संतोष ऊर्फ संत्या कांबळे अशी असल्याचे सांगितले.
वाळूज एमआयडीसीत दरोड्याचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 12:51 AM