रुख्साना सलिमोद्दीन काजी यांच्या पतीच्या नावे वाळूजच्या गट नंबर २७० मध्ये ५ एकर जमीन आहे. काही दिवसांपूर्वी रुख्साना यांच्या पतीने निधन झाले असून, गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास रुख्साना या जमिनीची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी रुख्साना यांना मुजीब खान, जावेद खान व अफरोज पठाण हे दुचाकीवरून निघून जाताना दिसले. यानंतर रुख्साना यांनी जमिनीची पाहणी केली असता त्यांना संरक्षक तार कंपाऊंड व सिमेंटचे जवळपास ७० खांब तुटलेले दिसून आले. दुचाकीवरून पसार होणाऱ्या तिघांनी अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने जमिनीवरील तार कंपाऊंड व खांब तोडल्याचा संशय व्यक्त करून रुख्साना काझी यांनी वाळूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून तिघा संशयितांविरुद्ध वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
----------------------
स्वराज्य फाऊंडेशनतर्फे साहित्य वाटप
महानगर : स्वराज्य ॲक्टिव्ह रनर्स फाऊंडेशनच्या वतीने जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून ए.एस. क्लबजवळील रंगलाल बाहेती अंध मुलीच्या पुनर्वसन केंद्रात स्वयंपाकाचे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष राम लिंभारे, प्रकल्प व्यवस्थापक मधुकर सूर्यवंशी, प्रा. भरत सलामपुरे, ज्ञानेश्वर वडकर आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी दिव्यांग प्रशिक्षणार्थींचा सत्कार करून या केंद्रात स्वयंपाकासाठी लागणारे विविध साहित्य भेट देण्यात आले.
------------------------