औरंगाबाद : बीड बायपासवरील एसबीआयचे २५ लाखांची रोकड असलेले एटीएम चोरट्यांनी पळविण्याच्या घटनेला २४ तास उलटत नाही तोच शनिवारी रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास पडेगावच्या मिसबाह कॉलनीतील आणखी एक एटीएम गॅस कटरने कापून त्यातील रोकड पळविण्याचा प्रयत्न झाला.एटीएम सेंटरच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या वृद्धाने घटनेची माहिती तातडीने दुकानमालक आणि पोलिसांना कळविले. आपल्याकडे लोक येत असल्याचे पाहून चोरट्यांनी दुकानदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दगडफेक केली. ते कारने पसार झाले. एटीएममधील हालचाली बाहेर दिसू नये याकरिता दोन चोरट्यांनी एटीएमच्या रस्त्याकडील बाजूने चादर लावली. अन्य चोरट्यांनी रोकड लुटण्यासाठी गॅस कटरने हे एटीएम मशीन कापण्यास सुरुवात केली. चोरट्यांचे हे काम सुरू असतानाच एटीएम सेंटर असलेल्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहणाºया वृद्धाला अचानक जाग आली.
औरंगाबादमध्ये २४ तासांतच पुन्हा एटीएम फोडण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 5:43 AM