छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठी जुनाट नेत्यांचे(मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता) मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचे स्वप्न असल्याचा आरोप मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. जुनाट नेत्याचे स्वप्न पूर्ण होऊ न देण्यासाठी मराठा समाजाने २४ डिसेंबरपर्यंत संयम बाळगावा, शांततेत लढा चालू ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.
शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे नाव न घेता जुनाट नेते असे उल्लेख करीत जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर टीका करताना ओबीसी एल्गार सभामधून ते आमचे हातपाय तोडण्याची भाषा करीत आहेत, दोन जातीमध्ये तेढ निर्माण करणारी भाषण करीत आहेत, सरकारने त्यांना आवरत का नाही, त्यांच्यावर गुन्हा का नोंदवित नाही,असा सवाल जरांगे पाटील यांनी केला.
जुनाट नेत्याने स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी छगन भूजबळ यांना पुण्यात घेराव घातल्याकडे जरांगे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, या घटनेला भुजबळच जबाबदार आहे, त्यांची भाषा मराठा समाजाबद्दल वेगळी आहे. ओबीसी नेत्यांना तेढ निर्माण करायचे आहे, त्यांची इच्छा मराठा समाजाने पूर्ण होऊ देऊ नये, आपल्याला २४ डिसेंबर रोजी आरक्षण मिळणारच आहे. समाजाने शांत राहावं,असे आपले समाजाचे लेकरू म्हणून कळकळीचे आवाहन असल्याचे जरांगे म्हणाले. १ डिसेंबरपासून चौथ्या टप्प्यातील दौराचौथा टप्प्यातील आपला दौरा १ डिसेंबरपासून सुरू होत आहे. १ रोजी जालना येथे सभा होईल. २ डिसेंबर रोजी कोलते पिंपळगाव(ता.भोकरदन) येथे स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकांस अभिवादन करून चौथ्या टप्प्यातील अधिकृत दौरा सुरू होईल. मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समाज बांधवांचा आशिर्वाद घेण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी जाणार आहे.