शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
2
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
3
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
4
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
5
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
6
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
7
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
8
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
9
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
10
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
11
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
12
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
13
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
14
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
15
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
16
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
17
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
19
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
20
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत

विद्यार्थिनीवर अत्याचारानंतर प्रशिक्षकाचा जीवन संपविण्याच्या प्रयत्न; तेवढ्यात पोलिस आले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 12:07 PM

स्पर्धेसाठी जाण्याचे सांगून राष्ट्रीय खुळाडू १३ वर्षीय विद्यार्थिनीवर प्रशिक्षकाकडून अत्याचार

छत्रपती संभाजीनगर : खो-खो राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या १३ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा विकृत प्रशिक्षक शिवाजी जगन्नाथ गोरडे (रा. बालानगर, ता. पैठण) याला वेदांतनगर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली.

पीडित मुलीची काही दिवसांपूर्वी खो-खोच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. २६ सप्टेंबर रोजी शिवाजीने त्याच्या तयारीसाठी तिला मुंबईला जायचे असल्याचे कारण सांगून तिला शहरातील मुख्य रेल्वेस्थानक परिसरात आणले. तेथून थेट तिच्यावर धाकदपटशाही करत हॉटेल ग्रेट पंजाबमध्ये नेले. मुलीने प्रतिकार करूनही तिच्यावर खोलीमध्ये पाशवी अत्याचार केले. राष्ट्रीय स्तरावरील खो-खोचा खेळाडू असल्याचा प्रभाव व प्रशिक्षक असल्याने पीडिता मात्र या घटनेमुळे घाबरून तणावाखाली गेली होती. मंगळवारी पीडितेने हा प्रकार आईवडिलांना सांगितल्यानंतर ते शहरात आले. दामिनी पथकाच्या मदतीने त्यांनी वेदांतनगर ठाण्याच्या निरीक्षक प्रवीणा यादव यांच्याकडे तक्रार केली. यात शिवाजीसह त्याला हॉटेलची खोली उपलब्ध करुन देणाऱ्या हॉटेल मालक पूजा रोहित राठोड व सादिक मिर्झा बेग यांनादेखील सहआरोपी करण्यात आले.

आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आणि पोलिस पोहोचलेनिरीक्षक प्रवीणा यादव यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक संगीता गिरी, वैभव मोरे, अंमलदार बाळाराम चौरे, रंजूसिंग सुलाने प्रवीण मुळे, शिवाजी गायकवाड यांचे पथक मंगळवारी रात्रीतून शिवाजीच्या अटकेसाठी गावात धडकले होते. मात्र, तो घरी मिळून आला नाही. आसपास शोध घेत असताना तो शेतात लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शेतात धाव घेतली असता शिवाजी गळ्याला साडी बांधून झाडाला लटकून घेण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्यापूर्वीच पोलिस पाेहोचल्याने त्याला फासावरून उतरवून ताब्यात घेतले. यात त्याच्या गळ्याला दुखापत झाल्याने पैठणच्या स्थानिक रुग्णालयात उपचार करून रात्री शहरात आणण्यात आले. शिवाजी हा विवाहित असून त्याला तीन अपत्ये आहेत. शिवाय त्याचे दोन भाऊदेखील शिक्षक आहेत. सधन कुटुंबातील शिवाजीच्या या कृत्याने मात्र गावकऱ्यांनीदेखील तीव्र संताप व्यक्त केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरSexual abuseलैंगिक शोषण