दि. २२ मार्च रोजी बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. शेतकरी विकास पॅनेलला स्पष्ट बहुमत आहे. आधीच अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून नितीन पाटील यांचे नाव जाहीर झाले असल्याने, वेळेवर काही राजकारण घडते का, याबद्दल उत्सुकता आहे. उपाध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर झाला नव्हता. त्यामुळे उपाध्यक्ष कोण होईल, याबद्दलही कुतूहल निर्माण झाले आहे.
दोन मंत्री व संचालक बनलेल्या आमदारांना बँकेच्या या पदांमध्ये रुची असेल असे वाटत नाही. सुरेशदादा पाटील यांची पुण्याई आणि दोन वर्षे अध्यक्ष म्हणून केलेला कारभार लक्षात घेता, नितीन पाटील हेच अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार ठरतात. याबद्दल बऱ्याचजणांचे एकमत दिसून येत आहे.
स्वीकृत सदस्य म्हणूनही कोणाची वर्णी लागते, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. हरिभाऊ बागडे हे पराभूत झाल्यानंतर या बँकेत मागच्या दाराने येऊ इच्छितात काय, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यांनी स्वीकृत सदस्य बनावे, अशी मागणी आता पुढे आली आहे.