जालना : पक्षांसोबतच बालकांचा किलबिलाट़़़ थोरा-मोठ्यांनाही अवाक् करणारी रेखाटने़़़ चिमुकल्या हातातील कुंचल्यांनी कॅनव्हासवर सांडलेले रंग़़़ त्यातून निर्माण होणारी अप्रतिम कलाकृती़़़ आपल्या कल्पनाविष्कारातील जग कागदावर रंगवत रविवारच्या सुट्टीचा दिवस छोट्या मुलांनी आनंदात घालविला़ निमित्त होते लोकमत टाईम्स कॅम्पस क्लब आयोजित चित्रकला स्पर्धेचे़़़रविवारी येथील किड्स कॅम्ब्रीज इंग्रजी शाळेत सकाळी १० वाजेपासून ही स्पर्धा घेण्यात आली़ स्पर्धेत अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला़इयत्ता पहिली ते चौथी या गटातील विद्यार्थ्यांसाठी ‘माझी शाळा’ पाचवी ते सातवी गटासाठी ‘सहलीचे ठिकाण’ तर आठवी ते दहावी गटासाठी ‘गणेशोत्सव’ हा विषय ठेवण्यात आला होता़स्पर्धेच्या ठिकाणी शिस्तबद्धपणे परिक्षेसारखी चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती़ प्रत्येक हॉलवर दोन पर्यवेक्षक निगरानीला होेते़ विद्यार्थ्यांनी विषयाच्या अनुषंगाने आपल्या कल्पनेतील चित्र कॅनव्हॉसवर साकार केले़ सहलीला जातांनाचे प्रसंग, सहलीचे ठिकाण, कुटुंबासोबतची सहल, निर्सगरम्य ठिकाण़ हे अत्यंत कलात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांनी कॅनव्हासवर रंगविले़गणेशोत्सव विषय असलेल्या मोठ्या गटातील बहुतांश विद्यार्थ्यांनीही श्री गणरायाचे आकर्षक रूप साकरले़ परिसरातील देखावा़ गणेशमुर्तीसमोर सामुहिक आरती, गणेशोत्सवातील सामुहिक नृत्य,गणेश विर्सजन मिरवणूक आदी चित्रे व त्यात साजेशे रंगही भरले़ त्यामुळे परीक्षकांनाही विजेत्यांची निवड करणे अवघड झाले होते़ एकूणच लोकमत कॅम्पस क्लब आयोजित या स्पर्धेच्या माध्यमातून बाल कलाकारांनी धमाल मस्ती करत चित्रकलेचा मनमुराद आनंद लूटला़ परिक्षक म्हणून संतोष जोशी, मुकुंद दुसे, रूपक देशपांडे, यांनी काम पाहिले़ तर किड्स कॅम्ब्रीज स्कुलच्या संचालिका अलका गव्हाणे, शिक्षीका कविता नरवडे, रिना निर्मल, छाया चांदोडे, पूनम शाह, आरती वानखेडे, संध्या, पूनम, यांनी विशेष प्रयत्न केले़ (प्रतिनिधी)इयत्ता पहिली ते चौथी या गटातील प्रथम कृष्णा अग्रवाल(एम़ एस़ जैन इंग्रजी शाळा) द्वितीय महेक (एम़ एस़ जैन इंग्रजी शाळा) तर आकांशा लाचुरीये (अनिल जिंदल वर्ल्ड स्कुल ) हीने तृतीय क्रमांक पटकावला़४पाचवी ते सातवी गटात प्रांजल मगरे (सेंट मेरी हायस्कूल) हिने प्रथम, रूपक देशपांडे (मत्स्योदरी विद्यालय) द्वितीय तर सिद्धेश हिवाळे (मत्स्योदरी विद्यालय) तृतीय क्रमांक मिळविला़ ४आठवी ते दहावी गटात विपूल लोंंढे (आऱ एच़ व्ही़) प्रथम, दिव्या सरोदे (एम़एस़ जैन विद्यालय) द्वितीय तर आयुष गव्हाणे (किड्स कॅम्ब्रीज स्कुल)हिने तृतीय क्रमांक पटकावला़ ४कॅम्पस क्लब सदस्यता नोंदणीचे मोजके दिवस शिल्ल्क आहेत. सदस्यता नोंदणी लोकमत भवन, भोकरदन नाका़, जालना येथे सुरू आहे. अधिक माहिती साठी संपर्क सत्यजित राजपूत ९६६५१०११३४ यांच्याशी करावा.
चिमुकल्यांच्या कुंचल्यातून साकारली आकर्षक चित्रे
By admin | Published: September 08, 2014 12:19 AM