शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

दुर्दम्य इच्छाशक्ती ! ९० टक्के दिव्यांग अथर्व गोपाळला व्हायचंय जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 1:36 PM

दहावीत ९० टक्के तर बारावीत मिळवले ८५.६९ टक्के गुण

ठळक मुद्देस्वत:च्या क्षमतेवर गुण घेतल्याचा विशेष अभिमानयूपीएससीची तयारी सुरू

औरंगाबाद : दुर्दम्य इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणत्याही गोष्टीवर सहज विजय मिळवू शकतो, असे म्हटले जाते. ९० टक्के दिव्यांग असलेल्या अथर्व भास्कर गोपाळ या विद्यार्थ्याने दिव्यांगत्वावर मात करीत स्वअभ्यासातून बारावीच्या कला शाखेच्या परीक्षेत तब्बल ८५.६९ टक्के गुण मिळविले आहेत. दहावीलाही त्याने ९०.४० टक्के गुण मिळविले होते. अथर्वला जिल्हाधिकारी बनायचे असून, त्यासाठी यूपीएससी परीक्षेची तयारीही तो करीत आहे.

शहरातील न्यू हायस्कूलचा विद्यार्थी असलेला अथर्व तीन वर्षांचा असतानाच २००४ साली अतितापेमुळे दिव्यांगत्व आले. तेव्हापासून तो अंथरुणालाच खिळलेला आहे. त्याचे आई-वडील दोघेही जि.प. शाळेत शिक्षक आहेत. एक भाऊ अभियांत्रिकीचे शिक्षण घेतो. घरात दिवसभर बसून राहावे लागते. उभे राहता येत नाही. खुर्चीवर बसायचे असेल तर उचलून ठेवावे लागते. सतत काळजी घ्यावी लागते. शिक्षक असलेल्या आई-वडिलांनी अथर्वला इतर मुलांप्रमाणे कोणतीही गोष्ट पाहिली नाही, शिकवली नाही किंवा अनुभवली नाही, असे वाटू नये म्हणून प्रचंड मेहनत घेतली. 

अथर्व चौथीला असताना त्याने नवोदयची परीक्षा देत प्रथम क्रमांक मिळवला होता. मात्र, दिव्यांग असल्यामुळे त्याला तेथे प्रवेश घेता आला नाही. तरीही त्याने खाजगी शाळेत शिक्षण सुरू ठेवले. त्याला शाळेत केवळ परीक्षेपुरतेच जाता येत होते. त्यामुळे सर्व अभ्यास हा घरीच करावा लागे. आई-वडील दोघेही शिक्षक असल्यामुळे दिवसभर घराबाहेर असत. संध्याकाळी तेच अभ्यास करून घेत. त्यातून अथर्वने स्वअभ्यासाची सवय लावून घेतली. गणित, इंग्रजी, इतिहास, भूगोल, विज्ञान या विषयांना तोंडपाठ केले. दहावीच्या परीक्षेला मदतीसाठी लेखनिक घेतला. त्यात ९०.४० टक्के मिळवले. या आत्मविश्वासामुळे अथर्वने पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. विज्ञान शाखेला जायचे होते. मात्र, महाविद्यालयात प्रात्यक्षिक असते, त्यामुळे कला शाखेत प्रवेश घेतला. 

बारावीच्या परीक्षेतही लेखनिकाच्या मदतीने परीक्षा दिली. यात त्याला ८५.६९ टक्के एवढे गुण मिळाले आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षेत घेतलेल्या टक्केवारीचा अभिमान असून, स्वत:च्या क्षमतेवर गुण घेतल्याचा विशेष अभिमान वाटतो, असेही तो सांगतो. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन जिल्हाधिकारी बनायचे आहे. त्यासाठीची तयारी दोन वर्षांपासून सुरू आहे. त्यातही निश्चितच यश मिळणार, असेही तो सांगतो.

महापुरुषांच्या चरित्रग्रंथांचे वाचनअथर्वने केवळ परीक्षेचा अभ्यासच केलेला नाही, तर त्याने महापुरुषांच्या चरित्रग्रंथांचे वाचन केले आहे. यात शिवाजी महाराजांपासून ते महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आदींचा समावेश आहे. याशिवाय इतरही सामाजिक परिवर्तन करणारे लढे, स्वातंत्र्यसंग्रामाचा लढाही अथर्वला मुखोद्गत असल्याचे त्याचे वडील भास्कर गोपाळ यांनी सांगितले. क्रिकेट, फुटबॉल, संगीताचीही आवड असल्याचे अथर्वने सांगितले.

ऐतिहासिक किल्ले अन् पर्यटन स्थळांना भेटीअथर्व ९० टक्के दिव्यांग असल्यामुळे वर्षभर तो घरातच असतो. त्याला बाहेरील जग माहीत व्हावे यासाठी गोपाळ दाम्पत्य शाळांना सुट्या लागल्या की, अथर्वला घेऊन ऐतिहासिक किल्ले, पर्यटन स्थळांना भेटी देतात. आजपर्यंत त्यांनी अथर्वला घेऊन रायगड, शिवनेरी, विशालगड, पन्हाळा, भंडारदरा, माळशेज, ओझर, सिंदखेडराजा, दौलताबाद, वणी, सापूतारा अशा ठिकाणांना भेटी दिल्या आहेत. या भेटीमुळे अथर्वला अधिक जिद्दीने दिव्यांगत्वावर मात करण्याची प्रेरणा मिळते, असेही भास्कर गोपाळ यांनी सांगितले.

टॅग्स :Divyangदिव्यांगupscकेंद्रीय लोकसेवा आयोगStudentविद्यार्थीHSC Exam Resultबारावी निकालAurangabadऔरंगाबाद