लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गुरुवारी वीज वितरण कंपनीने महापालिकेच्या जायकवाडी येथील पाणीपुरवठा केंद्राची पाच तास वीज कपात केली होती. यातून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत येत असतानाच शनिवारी रात्री रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली १४०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी फुटली. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी तब्बल सहा तास शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला. त्यामुळे रविवार ते मंगळवारपर्यंत शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच शहरातील पाणीपुरवठ्यात दररोज नवीन नवीन विघ्न येत आहे. त्यामुळे औरंगाबादकरांवर पाण्यासाठी दाहीदिशा भटकंतीची वेळ येत आहे. गुरुवार, ८ फेब्रुवारी रोजी वीज कंपनीने थकबाकीसाठी जायकवाडी येथील वीजपुरवठा खंडित केला. शहराचा पाणीपुरवठा बंद होताच महापालिकेने तातडीने साडेतीन कोटी रुपयांचा भरणा केला. त्यानंतर सायंकाळी वीज कंपनीने विजेचा पुरवठा सुरळीत केला होता. पाच तास पाण्याचा उपसा बंद असल्याने सिडको-हडकोसह शहरातही पाण्यासाठी ओरड सुरू झाली होती. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कसेबसे प्रयत्न करून शुक्रवारी आणि शनिवारी नागरिकांची तहान भागविली. शनिवारी रात्री रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाजवळ १४०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी फुटली. १०० फूट कारंजे उडू लागले. तशाच अवस्थेत पाणीपुरवठा सुरू ठेवून शनिवारी पाळी असलेल्या वसाहतींना पाणी देण्यात आले. दुपारी पुरवठा बंद करून दुरुस्ती करण्यात आली. सायंकाळी दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. शनिवारी ज्या वसाहतींना पाणीपुरवठा होऊ शकला नाही, त्या वसाहतींना रविवारी पाणी देण्यात येईल. एक दिवस पाणीपुरवठा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती उपअभियंता के. एम. फालक यांनी दिली.सिडको-हडकोतही पाण्याची ओरडसिडको एन-५ आणि एन-७ येथील पाण्याच्या टाक्यांमध्ये जायकवाडीहून अत्यंत कमी पाणी येत आहे. त्यामुळे सिडको-हडकोतील अनेक वसाहतींना अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा मागील काही दिवसांपासून होत आहे.यासंदर्भात नगरसेवकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतरही पाणीपुरवठ्यात कोणतीही सुधारणा झाली नसल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे.साताºयातील जलवाहिनी दुरुस्त होईनामुख्य जलवाहिनी फुटल्याने सातारा गावातील चाळीस गल्ल्यांचा पाणीपुरवठा एक महिन्यापासून खंडित झाला आहे. सातारा ते श्रेयस कॉलेज रोडच्या मध्यभागी ही जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे नागरिकांना हातपंपावरून डोक्यावर किंवा सायकलीवर रोज पाणी आणावे लागते.रोड तयार करण्यापूर्वी येथे नवीन जलवाहिनी टाकण्याची मागणी नागरिकांनी अधिकाºयांकडे केली होती. सर्व्हे करून अधिकारी निघून गेले ते वर्षभर आलेच नाही. त्यावर सिमेंटचा पक्का रस्ता तयार करण्यात आला. त्याखाली असलेली जलवाहिनी आता फुटून पाणी वाया जात आहे. मुख्य रस्ता खोदून लोखंडी पाईपलाईन टाकण्यासाठीचे प्रयत्न आता पाणीपुरवठा विभागाला करावे लागणार आहेत. येथील इतर रस्ते, ड्रेनेज, पाणी, दिवे अशा महत्त्वाच्या समस्यांकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. दोन वर्षे उलटून गेले तरीदेखील महापालिका सातारा-देवळाईकडे लक्ष देत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
औरंगाबादमध्ये ३ दिवस पाण्याचे वांधे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:58 PM
गुरुवारी वीज वितरण कंपनीने महापालिकेच्या जायकवाडी येथील पाणीपुरवठा केंद्राची पाच तास वीज कपात केली होती. यातून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत येत असतानाच शनिवारी रात्री रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली १४०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी फुटली. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी तब्बल सहा तास शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला. त्यामुळे रविवार ते मंगळवारपर्यंत शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.
ठळक मुद्देजलवाहिनी फुटली : पाणीपुरवठ्यात दररोज नवीन विघ्न