औरंगाबाद : जिल्ह्यात सकाळी 55 रुग्णांची वाढ झाली. तर दुपारी चार रुग्णांची आणखी भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 746 झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
यामध्ये आलोक नगर, सातारा परिसर 1, पुंडलिक नगर 1, संजय नगर 1, बजाज नगर 1 या परिसरातील आहेत. यामध्ये 3 पुरुष आणि 1 महिला रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान, शहरात गुरुवारी सकाळी 55 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.यात भीमनगर भावसिंगपुरा 15, शिवपुरी पडेगाव 1, उस्मानपुरा 7, सिल्कमिल कॉलनी1, कांचनवाडी1 , नारळीबाग 1, आरटीओ ऑफिस परिसर 2, गरमपाणी 1, बन्सीलाल नगर1, सातारा परिसर 2, सातारा ग्रामपंचायत परिसर 5, सातारा खंडोबा मंदिर परिसर 1, हुसेन कॉलनी गारखेडा 2, संजयनगर 3, न्यायनगर 2, दत्तनगर गल्ली नंबर पाच 1, पुंडलिकनगर 1, गुरू नगर न्यू नंदनवन कॉलनी, गारखेडा 1, शहानुरवाडी 1, किलेअर्क 1, बेगमपुरा 1, रहेमानिया कॉलनी 1,(आन्वा मारुतीमंदिर भोकरदन)घाटीत उपचार 1, सिल्लेखाना 1, नाशन दर्गा परिसर शहाबाजार 1 या भागांतील बाधीत रुग्णाचा समावेश आहे.
शहरात कोरोनाचा २० वा बळी हुसैन कॉलनी येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या ५५ वर्षीय महिलेचा गुरुवारी पहाटे ५.२० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा शहरातील विसावा बळी ठरला आहे. घाटी रुग्णालयातील हा १७ वा मृत्यू असून दोन मृत्यू खाजगी तर एक जिल्हा रुग्णालयात झाला आहे. तर हुसैन कॉलनी, गारखेडा येथील हा दुसरा मृत्यू आहे. त्यांना कोरोनामुळे दोन्ही बाजूनी न्यूमोनिया आणि मधुमेह, रक्तदाबाचा त्रास होता असे डॉक्टरांनी सांगितले