औरंगाबाद : शहरात बुधवारी ८.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हिवाळ्यातील आतापर्यंतचे हे सर्वात कमी तापमान ठरले आहे. तापमानाच्या नीचांकाबरोबर शहरात बुधवारी पहाटे धुक्याची चादर पसरली. त्यामुळे औरंगाबादकरांची पहाट दाट धुक्यात हरवल्याचे चित्र पाहायला मिळाले.शहरवासीयांना आठवडाभरापासून थंडीने चांगलीच हुडहुडी भरली आहे. शहरात गेल्या बुधवारी (दि.१२) किमान ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. हिवाळ्यातील हे सर्वात कमी तापमान होते. त्यानंतर आठवडाभर तापमान १० ते १२ अंशांदरम्यान नोंदविले जात होते. आठवडाभरात तापमानाने पुन्हा एकदा बुधवारी आणखी नीचांकी गाठली. चिकलठाणा वेधशाळेत बुधवारी कमाल तापमान २६.८ तर किमान तापमान ८.९ नोंदविल्या गेले.थंडीचा जोर चांगलाच वाढला असून, शहर परिसरात बुधवारी सकाळी दाट धुक्याचे आच्छादन पसरले. शहरातील उड्डाणपूल, रस्ते, डोंगर दाट धुक्यात गडप झाले होते. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, काश्मीर या भागांमध्ये दाट धुके असते. अशा दाट धुक्याचा औरंगाबादकरांना अनुभव आला. त्यामुळे सकाळच्या वेळी व्यायाम आणि कामानिमित्त बाहेर पडलेल्या अनेकांना काश्मीरची आठवण झाली. वाहने चालविताना अगदी हाकेच्या अंतरावरील काहीही दिसत नव्हते. त्यामुळे लाईट लावूनच वाहने चालविण्याशिवाय पर्याय नव्हता. अनेकांनी धुक्याचा सुखद अनुभव घेऊन ‘सेल्फी’ काढल्या.बाजारपेठेत गर्दीथंडीच्या कडाक्यामुळे दिवसाही चांगलाच गारवा जाणवत आहे. परिणामी दिवसाही ऊबदार कपडे वापरण्याची वेळ नागरिकांवर आली. थंडीमध्ये वाढ होत असल्याने ऊबदार कपड्यांची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत चांगलीच गर्दी होताना पाहायला मिळत आहे.कॅप्शन..शहरात बुधवारी अशा प्रकारे दाट धुक्यातून वाहनचालकांना मार्ग काढावा लागला.
औरंगाबाद @८.९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 11:01 PM
शहरात बुधवारी ८.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हिवाळ्यातील आतापर्यंतचे हे सर्वात कमी तापमान ठरले आहे. तापमानाच्या नीचांकाबरोबर शहरात बुधवारी पहाटे धुक्याची चादर पसरली. त्यामुळे औरंगाबादकरांची पहाट दाट धुक्यात हरवल्याचे चित्र पाहायला मिळाले.
ठळक मुद्दे शहर गारठले : यंदाचे सर्वात कमी तापमान, दाट धुक्यांनी काश्मीरची आठवण