औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट होत असल्याने दिलासा मिळत आहे; मात्र मृत्यूसत्रामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढत आहे. जिल्ह्यात सोमवारी २९० कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात उपचार सुरू असताना ५ वर्षाच्या बालिकेसह ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात गेल्या आठवडभरात कोरोनाबाधित ४ बालकांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सोमवारी (ता.३१) २९० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, पाच वर्षांच्या मुलीचाही मृत्यू झाला आहे. मुलांचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील नव्या रुग्णांमध्ये शहरातील २१२ आणि ग्रामीण भागातील ७८ रुग्णांचा समावेश आहे. तर शहरातील ३९२ आणि ग्रामीण भागातील ४२८ रुग्णांना सोमवारी सुटी देण्यात आली. ५८१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
याशिवाय, सोमवारी ११ जणांना कोरोनाचे नवीन व्हेरिएंट ओमिक्राॅनची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच आतापर्यंत ओमिक्राॅनच्या रुग्णांची संख्या ५० झाली आहे. मराठवाड्यात सर्वाधिक रुग्णसंख्या औरंगाबादेत असून त्यानंतर उस्मानाबादेत रुग्ण आहेत.