लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या आदेशानुसार औरंगाबादेत ‘जुक्टा’च्या वतीने शुक्रवारी शैक्षणिक बंदची हाक देण्यात आली होती; परंतु शहर वगळता अन्य ठिकाणी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. उर्वरित जिल्ह्यांत मात्र ‘जुक्टा’च्या वतीने जेलभरो आंदोलन केले.संघटनेने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शासनासोबत चर्चा केली. चर्चेनंतरही प्रश्न मार्गी न लागल्यामुळे संघटनेने चालू शैक्षणिक वर्षात पाच टप्प्यात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ८ डिसेंबर रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालयांवर धरणे आंदोलन करण्यात आले. १९ डिसेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर धरणे आंदोलन, त्यानंतर १८ जानेवारीला राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक कार्यालयांवर मोर्चे काढण्यात आले. त्यानंतरही शासन मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात आल्यामुळे आज २ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या आदेशानुसार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी प्राचार्यांकडे आज सामूहिक रजा देऊन या आंदोलनात सहभाग घेतला.बारावीच्या परीक्षेपूर्वी शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास महासंघाने दिलेल्या अंतिम इशाºयानुसार बारावी बोर्डाच्या मौखिक, प्रात्यक्षिक, लेखी परीक्षा तसेच पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही ‘जुक्टा’ संघटनेचे जिल्हा सचिव प्रा. संभाजी कमानदार, प्रा. राजेंद्र पगारे, प्रा. मंगेश मोरे, प्रा. जिजा शिंदे, प्रा. इंगळे आदींनी दिला. दुपारी शिक्षण उपसंचालक खांडके यांना निवेदन सादर करण्यासाठी संघटनेचे शिष्टमंडळ गेले; पण खांडके यांच्याकडे लातूर विभागाच्या शिक्षण उपसंचालकांचाही अतिरिक्त प्रभार असल्यामुळे ते तिकडे गेले होते.
औरंगाबादेत शैक्षणिक बंद संमिश्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 12:17 AM
महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या आदेशानुसार औरंगाबादेत ‘जुक्टा’च्या वतीने शुक्रवारी शैक्षणिक बंदची हाक देण्यात आली होती; परंतु शहर वगळता अन्य ठिकाणी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. उर्वरित जिल्ह्यांत मात्र ‘जुक्टा’च्या वतीने जेलभरो आंदोलन केले.
ठळक मुद्देजुक्टा : शिक्षण उपसंचालक कार्यालयाला दिले निवेदन