औरंगाबाद : चित्रपट असो वा दूरचित्रवाणीवरील एखादा कार्यक्रम, त्यामध्ये विमानतळावरील एखादा प्रसंग हमखास असतो. अशा प्रसंगाच्या चित्रीकरणासाठी सोयीच्या विमानतळांचा शोध घेतला जातो. चित्रपटाचे माहेरघर असलेल्या मुंबईपासून औरंगाबाद शहर अवघ्या काही अंतरावर आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत निर्मात्यांना औरंगाबादचे विमानतळ खुणावत आहे. त्यामुळे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरही रोल... कॅमेरा...अॅक्शनचा आवाज घुमत आहे.चित्रपट, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम, जाहिरात आदींच्या चित्रीकरणात अनेकदा विमानतळावरील दृश्य महत्त्वपूर्ण ठरते. आजघडीला मुंबईसह अनेक विमानतळांवर चित्रीकरण करण्यासाठी गर्दीसह अनेक अडचणी येतात. त्यामुळे आता नव्या ठिकाणी चित्रीकरण करण्यासाठी अनेकांकडून प्राधान्य दिल्या जात आहे. त्यासाठी विमानतळांचा शोध घेतला जातो. अशा वेळी मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या आणि पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराकडे सर्वांचे लक्ष केंद्रित होत आहे. चिकलठाणा विमानतळाच्या अधिकाऱ्यांनीही त्यादृष्टीने पोषक वातावरण निर्माण केले आहे. चित्रीकरणासाठी आवश्यक असलेली परवानगी एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जात आहे. त्यामुळे परवानगी मिळविण्यासाठी निर्मात्यांची होणारी अडचण दूर होण्यास मदत होते.विमानतळावरील धावपट्टी आणि विमान उभ्या करण्याच्या परिसरात चित्रीकरण करण्यासाठी डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन (डीजीसीए) यांच्याकडून परवानगी दिली जाते. चित्रीकरणासाठी तासाचे दरविमानतळावर चित्रीकरण करण्यासाठी तासानुसार रक्कम आकारली जाते. त्यामुळे विमानतळाच्या उत्पन्नातही भर पडण्यास मदत होते. शिवाय औरंगाबाद शहराचे नाव चित्रीक रणाच्या माध्यमातून जगभर उमटते, असा विश्वास अधिकाऱ्यांनी केला.अनेकांचा संपर्कचित्रीकरणासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण निर्माण केले जात आहे. आवश्यक असलेली परवानगी एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते. चित्रीकरणासाठी अनेक जण संपर्क साधत आहेत. यातून विमानतळाला पुरेसे उत्पन्नदेखील मिळते, असे चिकलठाणा विमानतळाचे निदेशक आलोक वार्ष्णेय म्हणाले.आठ निर्मात्यांची पाहणीगेल्या सहा महिन्यांत चित्रीकरणाच्या दृष्टीने आठ निर्मात्यांनी विमानतळाची पाहणी केली आहे. यामध्ये दोघांचे चित्रीकरणही झाले आहे. यामध्ये एका दूरचित्रवाणीवरील लावणीच्या स्पर्धात्मक कार्यक्रमाचा समावेश आहे. त्याचे मार्चमध्ये मोठ्या धूमधडाक्यात चित्रीकरण झाले.
चित्रीकरणासाठी औरंगाबाद विमानतळाला प्राधान्य
By admin | Published: June 02, 2016 1:06 AM