औरंगाबाद : जगप्रसिद्ध लेण्यांकडे जाणाºया औरंगाबाद ते अजिंठा रस्त्याच्या चौपदरीकरणाला सुरुवात झाली खरी; मात्र सदरील रस्त्याचे एका बाजूचे साडेसात मीटर रुंदीचे काम पूर्ण करून घेतल्यानंतर पुढे दुसºया टप्प्यातील कामाचे जे होईल ते होईल, अथवा ते काम रेंगाळेल, त्याबाबत नंतर बघू, अशी मानसिकता या रस्त्यासाठी काम करणाºया अधिकारी आणि यंत्रणेची झाली आहे. दीड वर्षापासून पर्यटक, शासकीय कर्मचारी, सामान्य नागरिक त्या रस्त्यावरून ये-जा करताना प्रचंड यातना सहन करीत आहेत. रस्त्याच्या कामाला पैसा आणि गती देण्यासाठी अजून कुठलीही मुदत बांधकाम विभागाच्या राज्य महामार्ग बांधणी विभागाने निश्चित केलेली नाही. परिणामी जुनाच रस्ता बरा होता, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.कंत्राटदाराने कमी दराने काम घेतल्यामुळे त्याला या कामातून काही मिळणार नाही. अतिशय अवघड परिस्थितीतून तो काम करीत आहे. त्याने समभाग विक्रीला काढले आहेत. त्यामुळे पुढील काम होईल की नाही याची शाश्वती नाही. जेवढे सध्या झाले आहे, त्यातील अडीच कि़मी. काम झाले की, एक बाजू पूर्ण होईल. उर्वरित कामाचे पुढे जे काय व्हायचे ते होईल. कारण बांधकाम विभागाच्या राज्य महामार्ग बांधणी विभागाकडून हे काम केले जात आहे. त्याची सर्व सूत्रे मुंबईतून हलतात. स्थानिक कार्यालयाकडे काहीही अधिकार नसल्यामुळे येथील अधिकारी कागदी घोडे नाचवून मोकळे होत असल्याचे एका अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.कंत्राटदाराला काम करणे जडअजिंठा ते सिल्लोडच्या कामाला मंजुरी मिळणे बाकी आहे. सध्या कंत्राटदार चहाला महाग झाला आहे. तिन्ही बीडस् बाजारात विकायला काढले आहेत. नॅशनल हायवेचे काम करताना पूर्ण अटी व शर्थी पाळाव्याच लागतात. मुळात ऋत्विक एजन्सी ही कंत्राटदार कंपनी एव्हिएशनची कामे करणारी कंपनी आहे. त्यांना रस्त्याच्या कामांचा अनुभव आहे की नाही, याबाबत साशंकता आहे. घेताना कमी दराने काम घेतले; परंतु आता ऋत्विक एजन्सीला काम करणे जड चालले आहे, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. एका बाजूने साडेसात मीटर रस्ता आणि मुरमाचा भराव टाकून काम पूर्ण करून घेण्यात येईल. आळंदपर्यंत रस्ता होत आला आहे. ऋत्विक एजन्सीबरोबर नव्याने करार होणे बाकी आहे. त्या कंपनीचा कुठलाही जबाबदार कर्मचारी औरंगाबादच्या कार्यालयात येत नाही. त्यामुळे कराराची संचिका रेंगाळली आहे. सुधारित अंदाजपत्रकानुसार नव्याने करार झाल्यानंतर त्या कामाची मुदत ठरेल.
औरंगाबाद-अजिंठा रस्त्याच्या चौपदरीकरणाला बसणार खीळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 11:45 PM
जगप्रसिद्ध लेण्यांकडे जाणाºया औरंगाबाद ते अजिंठा रस्त्याच्या चौपदरीकरणाला सुरुवात झाली खरी; मात्र सदरील रस्त्याचे एका बाजूचे साडेसात मीटर रुंदीचे काम पूर्ण करून घेतल्यानंतर पुढे दुसºया टप्प्यातील कामाचे जे होईल ते होईल, अथवा ते काम रेंगाळेल, त्याबाबत नंतर बघू, अशी मानसिकता या रस्त्यासाठी काम करणाºया अधिकारी आणि यंत्रणेची झाली आहे.
ठळक मुद्देपुढे काय होईल ते होईल : पैशांअभावी एका बाजूने रस्ता करून घेणार, अधिकाऱ्यांची मानसिकता