औरंगाबाद : गुंतवणूक आणि उत्पादन वाढीच्या दृष्टीने नवीन विकसनशील शहरांची ओळख करून देणाऱ्या ‘ग्ली स्टेटी जनरली- इनोव्हॅझिओन- मॅक्रोइकॉनॉमिया’ या इटालियन मासिकाने नावीन्यपूर्ण उत्पादनाच्या जगातील पहिल्या पाच महत्त्वाच्या शहरांत औरंगाबादला स्थान दिले आहे.औरंगाबादसोबतच चीनमधील बीजिंग-टियांजिन, मुंबई, दक्षिण कोरियातील सेऊल, अमेरिकेतील बोस्टन आणि जर्मनीतील ड्रेस्डेन ही शहरे या यादीत आहेत. ‘इनोव्हॅझिओन’च्या मते, ही शहरे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध औद्योगिक प्रभावी आणि सर्वांत मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसह सर्वांत नावीन्यपूर्ण जागतिक उत्पादनाची शहरे आहेत.
शहरांमध्ये जागतिक दर्जाची विद्यापीठे आणि संशोधन केंद्रांसह आघाडीच्या प्रयोगशाळा आणि कारखाने आहेत. टाटा समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलिव्हर व मोठ्या बँका यासारख्या आयसीटी, टेक्सटाइल, फार्मास्युटिकल कंपन्यांचे उत्पादन युनिट म्हणून मुंबई-औरंगाबादचे वर्गीकरण केले आहे.
मुंबई - सर्वांत महत्त्वाची मेगा सिटीनियतकालिकाने मुंबईचे वर्गीकरण दक्षिण आशियातील सर्वांत महत्त्वाचे मेगा सिटी, जागतिक दर्जाचे आर्थिक, औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्र आणि प्रचंड कामगार असलेले शहर म्हणून केले आहे. जीडीपीमध्ये मुंबईचा वाटा ५ टक्के आणि संपूर्ण भारताच्या आर्थिक व्यवहारात ७० टक्के आहे.
औरंगाबादेतील निर्यातीचे पाच वस्तू मूल्य (यूएस डॉलर दशलक्षमध्ये)nअभियांत्रिकी वस्तू १०६२.०७nऔषधी आणि फार्मास्युटिकल्स २१७.३९ nप्लास्टिक आणि लिनोलियम १४९.९ nसेंद्रिय आणि अजैविक रसायने ४३.६९
उत्पादन क्षेत्रात औरंगाबाद अव्वल‘इनोव्हॅझिओन’ या नियतकालिकाच्या अहवालात म्हटले आहे की, औरंगाबाद हे ८ लाख लोकसंख्येचे शहर असून, ऑटोमोटिव्ह, अभियांत्रिकी आणि फार्मास्युटिकल्स यासारख्या उत्पादन क्षेत्रांमध्ये हे शहर पुढे आहे. शहराच्या विस्तीर्ण औद्योगिक वसाहतींमध्ये सीमेन्स, बीएमडब्ल्यू, स्कोडा यासारख्या विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्लांटस् आहेत. उद्योगाबरोबरच औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठदेखील आहे, जे संपूर्ण भारतातील सर्वांत लोकप्रिय विद्यापीठांपैकी एक आहे. नियतकालिकाने असा अंदाज वर्तविला आहे की, येत्या काही वर्षांत याहूनही अधिक वेगाने या शहराची वाढ होईल. विद्यार्थी आणि संशोधक देशभरातून अभ्यास करण्यासाठी आणि व्यवसाय करण्यासाठी येथे येतात. त्यामुळे शहराच्या क्रमवारीत आणखी सुधारणा होईल.