शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
2
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
3
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
4
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
5
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
6
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
7
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
8
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
9
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
10
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
11
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
12
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
13
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
14
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
15
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
16
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
17
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
18
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
19
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
20
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 

विविध पदार्थांच्या अस्सल चवीने औरंगाबादकर तृप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:12 AM

कोणी कोलकाताच्या पाणीपुरीचा आस्वाद घेत होते, कोणी गुजरातचा व्हाईट ढोकळा खात होते, तर काही जण जोधपुरी मिरची वडा, तर काहींनी पंजाबमधील डॉलर जलेबी विथ रबडीवर ताव मारला. काही खवय्ये तर दक्षिणेतील पायनापल शिºयाची चव चाखत होते. एवढे नव्हे तर अनेक जण असे होते की, ते ग्लोबल स्टॉलवर थाई करी विथ राईस खाण्यात मग्न झाले होते. विविध राज्यांतील खाद्य संस्कृती समृद्ध तेथील ओरिजनल चवीचे पदार्थ चाखण्यास मिळाल्याने पोट व मन तृप्त झाले, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया खाद्यप्रेमींनी व्यक्त केल्या.

ठळक मुद्देपर्वणीचा काळ : ‘लोकमत टाइम्स फूड फेस्टिव्हल’ला पहिल्या दिवशी उदंड प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कोणी कोलकाताच्या पाणीपुरीचा आस्वाद घेत होते, कोणी गुजरातचा व्हाईट ढोकळा खात होते, तर काही जण जोधपुरी मिरची वडा, तर काहींनी पंजाबमधील डॉलर जलेबी विथ रबडीवर ताव मारला. काही खवय्ये तर दक्षिणेतील पायनापल शिºयाची चव चाखत होते. एवढे नव्हे तर अनेक जण असे होते की, ते ग्लोबल स्टॉलवर थाई करी विथ राईस खाण्यात मग्न झाले होते. विविध राज्यांतील खाद्य संस्कृती समृद्ध तेथील ओरिजनल चवीचे पदार्थ चाखण्यास मिळाल्याने पोट व मन तृप्त झाले, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया खाद्यप्रेमींनी व्यक्त केल्या.प्रसंग होता... लोकमत टाइम्स फूड फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवसाचा... शहराच्या हृदयस्थानी असलेल्या क्रांतीचौक येथील हॉटेल मनोरच्या लॉन्सवर भव्य फूड फेस्टिव्हल उभारण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपासून फेस्टिव्हलला सुरुवात झाली. मात्र, खाद्यप्रेमींनी ४.३० वाजेपासून येणे सुरू केले होते. दर्शनी भागात लावण्यात आलेली आकर्षक लायटिंग आणि पाण्याचे झरे सर्वांना मोहित करीत होते. अनेक जण या ठिकाणी थांबून मोबाईल कॅमेºयात हे दृश्य कैद करीत होते. डाव्या बाजूला लावण्यात आलेल्या पाणीपुरीच्या स्टॉलवर खाद्यप्रेमींच्या उड्या पडत होत्या. अंबाला पाणीपुरी, गुजरात पाणीपुरी, मुंबई पाणीपुरी व कोलकाता पाणीपुरी असे प्रकार येथे होते. प्रत्येक पाणीपुरीची चव वेगवेगळी होती. विशेषत: महिला व तरुणींचा ओढा अधिक होता. डाव्या बाजूला वेस्ट स्टॉलमध्ये राजस्थानी ड्रेस परिधान केलेले युवक आलू मटर समोसा, बदाम मूग हलवा, खोबरा पॅटीस, गराडू असे २५ पेक्षा अधिक पदार्थ सर्वांना देत होते. गुजरात चाटच्या स्टॉलवरही गर्दी उसळली होती. नॉर्थ स्टॉलवर पंजाबी पोशाख परिधान केलेले युवक दिल्ली चाट, राय्जमा विथ स्टीम राईस आदी पदार्थ देत होते. डाव्या बाजूस साऊथ स्टॉलवर धोतर नेहरू शर्ट खांद्यावर पंचा असा पारंपरिक पोशाख घातलेले युवक मंच्युरियन, उत्तप्पा, पिझ्झा, इडली असे दाक्षिणात्य खाद्यपदार्थ बनवीत होते. ग्लोबल स्टॉलवर कोट, टाय असा पोशाख घातलेले शेफ खास वेज हक्का नूडल्स, स्पिनॅच ब्रेड, वेज कॅपसीकम पिझ्झा असे एक ना अनेक खाद्यपदार्थ खवय्यांना तयार करून देत होते.कोणी उंच टेबलावर डिश ठेवून तर कोणी आरामशीर खुर्चीवर बसून विविध पदार्थांचा आस्वाद घेत होते. रात्री ११ वाजेपर्यंत खाद्यप्रेमी या प्रदर्शनात येत होते. फेस्टिव्हलच्या पहिल्याच दिवशी शहरवासीयांचा उदंड प्रतिसाद मिळाला.आज फेस्टिव्हलचा दुसरा दिवसतीनदिवसीय लोकमत फेस्टिव्हलचा शनिवारी २० रोजी दुसरा दिवस आहे. सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत फेस्टिव्हल सर्वांसाठी खुले आहे. विशेष म्हणजे येथे हॉटेल मनोरच्या पाठीमागील बाजूस असलेल्या खाऊगल्लीच्या मैदानावर वाहन पार्किंगची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. या फेस्टिव्हलमध्ये खाद्यप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.मनोरंजनाची मेजवानी४फेस्टिव्हलमध्ये खाद्यपदार्थांसमवेत मनोरंजनाची मेजवानीचा आस्वाद खाद्यप्रेमी घेत आहेत. आज लोककलावंतांनी लावणीपासून ते दांडियापर्यंतचे विविध नृत्य प्रकार सादर करून सर्वांना खिळवून ठेवले, तर व्यावसायिक गायकांनी सदाबहार गीत सादर करून सर्वांची वाहवा मिळविली. बच्चेकंपनीसाठी खास खेळण्यासाठी स्वतंत्र विभाग येथे तयार करण्यात आला आहे. तेथील विविध खेळण्यांचा आनंद लहान मुले घेत होते.