लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ९ आॅगस्ट रोजी शहरात झालेल्या बंददरम्यान दिवसभर पुंडलिकनगर येथे ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या एका लघुउद्योजकाने कर्जबाजारी आणि आरक्षण मिळत नसल्याचे चिठ्ठीत नमूद करून गुरुवारी रात्री राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच संतप्त सकल मराठा समाजाने विजयनगर चौकात सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन करीत रास्ता रोको केला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने मृताच्या वारसांना दहा लाख रुपये मदत देण्याचे पत्र दिले.कारभारी दादाराव शेळके, असे मृताचे नाव आहे. प्राप्त माहिती अशी की, कारभारी हे एपीआय कॉर्नर येथे प्लास्टिक मोल्डिंगचा व्यवसाय करीत. लघु उद्योगासाठी सरकारी बँकांनी त्यांना कर्ज नाकारल्याने त्यांना एका खाजगी फायनान्स कंपनीकडून दोन लाख रुपये कर्ज घ्यावे लागले. नोटाबंदी झाल्यापासून त्यांना मिळणाऱ्या आॅर्डर कमी झाल्या आणि त्यांचा लघुउद्योग डबघाईला आला. परिणामी, त्यांचे कर्ज थकल्याने फायनान्स कंपनीकडून कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जाऊ लागला. यामुळे ते त्रस्त होते. दोन वर्षांपासून मराठा क्रांती मोर्चाच्या प्रत्येक आंदोलनात ते सहभागी होत असत. ९ आॅगस्ट रोजी शहरात झालेल्या बंददरम्यान दिवसभर ते पुंडलिकनगर येथे ठिय्या आंदोलनात सहभागी होते. रात्री घरी जेवण केल्यानंतर गल्लीतील भजनी मंडळासोबत रात्री १२.३० वाजेपर्यंत त्यांनी भजने गायली. त्यानंतर ते घरी गेले आणि घराच्या लोखंडी गेटला दोरी बांधून त्यांनी गळफास घेतला. ही घटना रात्री ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती मुकुं दवाडी पोलिसांना देण्यात आले. यावेळी त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती पडली. या चिठ्ठीत त्यांनी नमूद केले की, ‘मला कोणाचाही त्रास नव्हता. मी मराठा समाजाचा असून, मला काहीही फायदे मिळाले नाहीत, मी श्रीराम फायनान्समधून दोन लाख रुपये लोन काढले होते. फायनान्सवाले मला जास्त परेशान करीत होते, म्हणून मी आत्महत्या केली. मी घरच्यांचा उदरनिर्वाह पुरवू शकलो नाही, म्हणून मी घरच्या लोकांचा आभारी आहे.’तीन तास ठिय्यायाबाबतची माहिती मिळताच सकल मराठा समाजाने विजयनगर चौकात ७ वाजेपासून ठिय्या देण्यास सुरुवात केली.सहायक आयुक्त रामचंद्र गायकवाड, नागनाथ कोडे, निरीक्षक सिनगारे यांनी तेथे धाव घेऊन जिल्हा प्रशासनाला ही बाब कळविली.जिल्हाधिकाºयांच्या वतीने उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांनी शेळके यांच्या वारसांना दहा लाख रुपये मदत देण्याचे पत्र दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी औरंगाबादेत आणखी एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:11 AM
९ आॅगस्ट रोजी शहरात झालेल्या बंददरम्यान दिवसभर पुंडलिकनगर येथे ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या एका लघुउद्योजकाने कर्जबाजारी आणि आरक्षण मिळत नसल्याचे चिठ्ठीत नमूद करून गुरुवारी रात्री राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच संतप्त सकल मराठा समाजाने विजयनगर चौकात सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन करीत रास्ता रोको केला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने मृताच्या वारसांना दहा लाख रुपये मदत देण्याचे पत्र दिले.
ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाकडून दहा लाखांच्या मदतीचे पत्र : दिवसभर बंदमध्ये दिला ठिय्या