शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

खंडपीठाने रेकॉर्ड सादर करण्यासाठी दिला आठवडाभराचा वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 2:04 PM

आमदार संगीता ठोंबरे यांच्या सूतगिरणीसंदर्भात याचिका 

ठळक मुद्देलोकनेते गोपीनाथराव मुंडे सहकारी सूतगिरणीस शासनाने दिलेले अनुदान परत घ्यावे

औरंगाबाद : केजच्या आमदार संगीता ठोंबरे संस्थापक अध्यक्ष आणि मुख्य प्रवर्तक असलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे सहकारी सूतगिरणीस शासनाने दिलेले अनुदान परत घ्यावे, तसेच संबंधितांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, अशी विनंती करणारी जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली आहे. 

सदर संस्थेचे उपविधी (बायलॉज) व इतर काही रेकॉर्ड सादर करण्यासाठी न्या. प्रसन्न बी. वराळे आणि न्या. ए.जी. घारोटे यांच्या खंडपीठाने शुक्रवारी वेळ दिला. याचिकेची पुढील सुनावणी एक आठवड्यानंतर होणार आहे. बोगस सभासद दाखवून सूतगिरणीची नोंदणी करून घेतली व शासनाकडून अनुदान घेतले. ते परत घ्यावे, अशी याचिकाकर्त्याची विनंती आहे. 

केज येथील सचिन भीमराव चव्हाण यांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटल्यानुसार ठोंबरे यांनी नागपूर येथील प्रादेशिक उपसंचालक वस्त्रोद्योग यांच्याकडे वरील सूतगिरणीच्या नोंदणीचा प्रस्ताव पाठविला. सदर सूतगिरणी ही मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी असल्यामुळे किमान ७० टक्के सभासद हे एस.सी. आणि एस.टी. संवर्गातील असणे आवश्यक आहे. परंतु दर्शविलेले लोक वरील अटींची पूर्तता करीत नाहीत. शिवाय बोगस नावे दाखवून प्रस्ताव पाठविला, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. 

याचिका निकाली काढली होतीयाचिकाकर्ता चव्हाण यांनी २३ जुलै २०१८ ला संचालक वस्त्रोद्योग यांना तक्रार देऊन वरील सूतगिरणीशी संबंधित ३२ मुद्यांवर चौकशी करण्याची विनंती केली होती. शासनाच्या पैशाचा दुसऱ्या कामासाठी उपयोग केला. संस्थेवर फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी विनंती त्यांनी केली आहे. मात्र, संबंधितांनी चौकशी केली नाही म्हणून चव्हाण यांनी याआधी खंडपीठात याचिका दाखल केली होती. सूतगिरणीची चौकशी चालू असल्याचे शासनाने शपथपत्र दाखल केल्यामुळे याचिका निकाली काढण्यात आली होती. 

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठCrime Newsगुन्हेगारीfundsनिधी