लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यंमत्री, राज्यसभेवरील खासदारांचा समांतर जलवाहिनी योजना मंजुरीसाठी मनपावर दबाव असल्याचा आरोप एमआयएमचे आ. इम्तियाज जलील यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला. त्यांच्या या आरोपावर आ. अतुल सावे, सदस्य संजय केणेकर यांनी आगपाखड करीत जलील यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला. या सगळ्या शाब्दिक गदारोळात शिवसेनेने सावध भूमिका घेतली. पालकमंत्री डॉ.दीपक सावंत म्हणाले, मनपाने योजनेचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवावा. शासन त्याबाबत निर्णय घेईल.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज डीपीसीची बैठक पार पडली. यावेळी आ.सावे म्हणाले, समांतरसाठी कोर्टाबाहेर ‘कॉम्प्रमाईज डीड’ (तडजोड करार) झाली पाहिजे. सध्याच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ४० वर्षे जुन्या झाल्या आहेत. शहरात ३ ते ४ दिवसांनी पाणीपुरवठा होतो आहे. समांतरबाबत पालकमंत्र्यांनी स्वतंत्र बैठक घ्यावी. सावे सभागृहात मत व्यक्त करून बसत नाहीत तोवरच लगेचच आ.जलील म्हणाले, शिवसेनेचे नेते रामदास कदम हे पालकमंत्री असताना त्यांनी समांतर जलवाहिनी योजनेच्या न्यायालयाबाहेर (पान २ वर)आयुक्त म्हणतात, काहीतरी केले पाहिजेमनपा आयुक्त डॉ.निपुण विनायक म्हणाले, सुरुवातीला ३५० कोटींची योजना होती. पीपीपीवर योजना कार्यान्वित करण्याचे ठरले.२ वर्षांत कंपनी काम करीत नसल्याचे समोर आले. त्यामुळे करार रद्द झाला. पाणीपुरवठ्याचे अद्ययावतीकरणाचे काम ठप्प पडले आहे. योजना पुनरुजीवित करण्यासाठी चर्चा होत आहे. कंपनीने दिलेला अहवाल सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे.२७ आॅगस्ट रोजी योजनेबाबत सभा आहे. त्यात चर्चा होईल. ६१ कि़मी. जलवाहिनी टाकणे, ३२ जलकुंभांची कमतरता आहे. १५०० कि़मी. अंतर्गत जलवाहिन्यांचे काम आहे. सातारा-देवळाई पाण्यापासून वंचित आहे.मनपाकडे अधिकारी कमी आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमनपाला अभियंते देण्यास तयार नाही. ३० अभियंत्यांची गरज आहे. एका उपअभियंत्यावर पूर्ण विभाग काम करीत आहे. एक्स्प्रेस जलवाहिनीवर अनधिकृत नळकनेक्शन आहेत. विद्युत मोटारी लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेची अवस्था दयनीय आहे. यावर काहीतरी केले पाहिजे.
औरंगाबादमध्ये भाजप-एमआयएममध्ये ‘समांतर’वरून खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:27 AM
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यंमत्री, राज्यसभेवरील खासदारांचा समांतर जलवाहिनी योजना मंजुरीसाठी मनपावर दबाव असल्याचा आरोप एमआयएमचे आ. इम्तियाज जलील यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला.
ठळक मुद्देशिवसेनेची सावध भूमिका : सावे, केणेकर, जलील यांच्यात वादावादी