औरंगाबाद : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे पुणे येथे सुरू असलेल्या निमंत्रित संघांच्या सिनिअर लीग क्रिकेट स्पर्धेत डावखुरा फिरकी गोलंदाज संदीप सहानी आणि स्वप्नील चव्हाण यांच्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर औरंगाबादने सोमवारी पीडीसीए संघाला अवघ्या १०८ धावांत गुंडाळले. त्यानंतर मधुर पटेल, विश्वजित राजपूत आणि शुभम चाटे या युवा फलंदाजांच्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर औरंगाबादने निर्णायक विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पुण्याच्या पीडीसीएची ३ बाद ५८ अशी स्थिती असून, ते अद्यापही १६३ धावांनी पिछाडीवर आहेत.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा पीडीसीएचा निर्णय त्यांच्या अंगलट आला. संदीप सहानी व स्वप्नील चव्हाण यांनी सुरेख फिरकी गोलंदाजी करताना पीडीसीएचा पहिला डाव २२.३ षटकांतच १०८ धावांत गुंडाळला. पीडीसीएकडून अनिकेत कुंभार (२०), मोहंमद ताहीर (१३), प्रशांतसिंग (१२) हेच दुहेरी आकडी धावा फटकावू शकले. औरंगाबादकडून संदीप सहानी याने ३४ धावांत ५ गडी बाद केले. त्याला स्वप्नील चव्हाणने २४ धावांत ३ व शुभम चाटेने १ गडी बाद करीत सुरेख साथ दिली.गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीनंतर चौफेर टोलेबाजी करणाऱ्या मधुर पटेलने जबरदस्त फार्मात असणाºया प्रज्वल घोडके याच्या साथीने १४.३ षटकांतच केलेली ११६ धावांची भागीदारी आणि त्यानंतर विश्वजित राजपूत व शुभम चाटे यांनी सातव्या गड्यासाठी ६३ चेंडूंत केलेल्या ८१ धावांच्या भागीदारीच्या बळावर औरंगाबादने ४७ षटकांतच ३२९ धावा फटकावल्या. अष्टपैलू शुभम चाटे याने सौरव जाधव याच्या साथीने ५७ चेंडूंत ५० धावांची अखेरच्या गड्यासाठी केलेल्या भागीदारीमुळे औरंगाबादची स्थिती आणखी भक्कम झाली. औरंगाबादकडून मधुर पटेल याने ५० चेंडूंतच ८ सणसणीत चौकार व ५ गगनभेदी षटकारांसह ७५ धावांची वादळी खेळी केली. युवा विश्वजित राजपूतने ३८ चेंडूंतच ३ गगनचुंबी षटकार व ८ खणखीत चौकारांसह ६४ आणि शुभम चाटे याने ५६ चेंडूंत ६ चौकार व ३ उत्तुंग षटकारांसह ५५ धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. प्रज्वल घोडकेने ४८ चेंडूंत ५ चौकारांह ३८, कर्णधार स्वप्नील चव्हाणने ४ चौकारांसह १९, सौरव जाधवने १३ चेंडूंतच ५ चौकारांसह २१ व सचिन लव्हेराने २ चौकारांसह १२ धावांचे योगदान दिले. पीडीसीएकडून मनोज चौधरीने ११५ धावांत ७ गडी बाद केले. जसविंदरसिंगने ८३ धावांत २ गडी बाद केले. पहिल्या डावात २२१ धावांची भक्कम आघाडी घेणाºया औरंगाबादने पीडीसीएचे ३ फलंदाज ५८ धावांत तंबूत धाडताना आपली पकड आणखी मजबूत केली. पीडीसीएकडून दुसºया डावात प्रसन्ना मोरेने २२ व मोहंमद ताहेरने १७ धावा केल्या. औरंगाबादकडून विकास नगरकरने ९ धावांत २ व प्रवीण क्षीरसागरने ८ धावांत १ गडी बाद केला.संक्षिप्त धावफलकपीडीसीए (पहिला डाव) : २२.३ षटकांत सर्वबाद १०८. (प्रसन्ना मोरे २६, अनिकेत कुंभार २०. संदीप सहानी ५/३४, स्वप्नील चव्हाण ३/२४, शुभम चाटे १/३१). दुसरा डाव : ३ बाद ५८. (प्रसन्ना मोरे २२, मोहंमद ताहेर १७. विकस नगरकर २/०९, प्रवीण क्षीरसागर १/०८).औरंगाबाद (पहिला डाव) : ४७.२ षटकांत सर्वबाद ३२९. (मधुर पटेल ७५, विश्वजित राजपूत ६४, शुभम चाटे ५५, प्रज्वल घोडके ३८, सौरव जाधव २१, स्वप्नील चव्हाण १९, सचिन लव्हेरा १२. मनोज चौधरी ७/११५, जसविंदरसिंग २/८२).
औरंगाबादने पीडीसीएला १०८ धावांत गुंडाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:41 AM
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे पुणे येथे सुरू असलेल्या निमंत्रित संघांच्या सिनिअर लीग क्रिकेट स्पर्धेत डावखुरा फिरकी गोलंदाज संदीप सहानी आणि स्वप्नील चव्हाण यांच्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर औरंगाबादने सोमवारी पीडीसीए संघाला अवघ्या १०८ धावांत गुंडाळले. त्यानंतर मधुर पटेल, विश्वजित राजपूत आणि शुभम चाटे या युवा फलंदाजांच्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर औरंगाबादने निर्णायक विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पुण्याच्या पीडीसीएची ३ बाद ५८ अशी स्थिती असून, ते अद्यापही १६३ धावांनी पिछाडीवर आहेत.
ठळक मुद्देसंदीप सहानीचे ५ बळी : मधुर, विश्वजित, शुभमची अर्धशतके