हर्सूल येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदिजनांसाठी एक हजार डेटॉल साबण व मास्क, ५० लीटर हँड सॅनिटायझर, ऑक्सिमीटर व ऑक्सिगन इत्यादी साहित्य देण्यात आले.
कोरोना व्हायरसच्या काळात जगभरातील सर्वच लोक चिंताग्रस्त आहेत. या अत्यंत बिकट काळात लोकांना अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या , काही जणांवर तर उपाशी राहण्याची वेळ देखील आली. अशा अनेक बातम्या आपण ऐकून आहोत. अनेक ठिकाणी हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना घडत आहेत परंतु ह्या बिकट परिस्थितीत औरंगाबाद धर्मप्रांतातर्फे सामाजिक भावनेने मदत केली जात आहे.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बिशप अम्ब्रोस रिबेलो, विकर जनरल फा.बेंन्नी कालिकत , संचालक फा.मायकल फ्रान्सिस , समन्वयक राजेंद्र दुशिंग तसेच औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह अधीक्षक जयंत नाईक, उपअधीक्षक आर. आर. भोसले , वरिष्ठ तुरुंग अधिकारी सुरेश साबळे , टाटा ट्रस्टचे दादासाहेब लहाने व महादेव डोंगरे उपस्थित होते. अधीक्षक नाईक यांनी संस्थेचे आभार मानले . यापुढेही असेच सहकार्य करावे , अशी अपेक्षा व्यक्त केली.