शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
3
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
4
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
5
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
6
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
7
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
8
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
9
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळं विराटचे लाड?
10
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
11
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
12
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
13
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
14
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
15
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
16
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
17
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
18
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
19
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
20
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस

औरंगाबाद ‘मध्य’ मतदारसंघात मतविभाजनावर विजयाचे गणित; चौरंगी लढत होणार हे निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 13:25 IST

कोण कोणाची किती मते घेईल, यावर एका उमेदवाराच्या विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले. आता चौरंगी लढत होणार हे निश्चित. हिंदूबहुल भागात शिंदेसेनेचे प्रदीप जैस्वाल विरुद्ध उद्धवसेनेचे पर्यायी उमेदवार बाळासाहेब थोरात अशी लढत पाहायला मिळेल. मुस्लीमबहुल भागात एमआयएमचे नासेर सिद्दिकी विरुद्ध वंचितचे जावेद कुरैशी अशी लढत रंगणार आहे. कोण कोणाची किती मते घेईल, यावर एका उमेदवाराच्या विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.

२०१९ मध्ये शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल विरुद्ध एमआयएमचे नासेर सिद्दिकी अशी सरळ लढत झाली होती. यंदाही याच दोन उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे. उद्धवसेनेने किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली. उद्धवसेनेवर आजपर्यंत अशी नामुष्की कधीच ओढावली नव्हती. त्यामुळे प्रदीप जैस्वाल यांचा मोठा राजकीय अडथळा दूर झाला आहे. उद्धवसेनेचे पर्यायी उमेदवार हिंदू मतांचे विभाजन किती करतील यावर जैस्वाल यांच्या विजयाचे गणित ठरणार आहे. अशीच परिस्थिती मुस्लीमबहुल भागात पाहायला मिळतेय. एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्दिकी यांच्यासमोर वंचितचे जावेद कुरैशी आहेत. कुरैशी यांचा मुस्लीम आणि दलित मतांवर डोळा आहे. ते किती मते घेतील यावर सिद्दिकी यांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे. या मतदारसंघात मनसेचे सुहास दाशरथे, उद्धवसेनेचे बंडखोर बंडू ओक हेसुद्धा निवडणूक रिंगणात आहेत.

मराठा फॅक्टर कोणाच्या बाजूने?या मतदारसंघात मनोज जरांगे फॅक्टरचा विचार केला तर मराठा मतदान कोणाकडे जाईल, यावरही बरेच काही अवलंबून असणार आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टर संदीपान भुमरे यांच्या बाजूने होता. विधानसभेला काय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकaurangabad-central-acऔरंगाबाद मध्यPradeep Jaiswalप्रदीप जैस्वाल