शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
3
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
4
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
5
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
6
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
7
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
8
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
9
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
10
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
11
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
12
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
13
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
14
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
15
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
16
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
17
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
18
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
19
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
20
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट

औरंगाबादेत ब्रह्मवृंदांची भक्ती, एकी, शिस्तीची अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:39 AM

बहुभाषिक ब्राह्मणांची एकी, भक्ती, शिस्तीची अनुभूती भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या शोभायात्रेत आली. बुधवारी सायंकाळी निघालेल्या शोभायात्रेत युवक-युवतींच्या ७ ढोलपथकांनी तर शहर दणाणून सोडले. मागील पाच वर्षांतील गर्दीचे विक्रम या शोभायात्रेने मोडीत काढले. एक लक्षवेधी, नियोजनबद्ध शोभायात्रा, पाहण्यात आल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देढोलपथकाचा दणदणाट : भगवान परशुराम जन्मोत्सव शोभायात्रा लक्षवेधी; पाच तास चालला जल्लोष

लोकमत न्यूज नेटवर्कऔैरंगाबाद : बहुभाषिक ब्राह्मणांची एकी, भक्ती, शिस्तीची अनुभूती भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या शोभायात्रेत आली. बुधवारी सायंकाळी निघालेल्या शोभायात्रेत युवक-युवतींच्या ७ ढोलपथकांनी तर शहर दणाणून सोडले. मागील पाच वर्षांतील गर्दीचे विक्रम या शोभायात्रेने मोडीत काढले. एक लक्षवेधी, नियोजनबद्ध शोभायात्रा, पाहण्यात आल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.ब्राह्मण समाज समन्वय समितीअंतर्गत भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने राजाबाजार येथून शोभायात्रा काढण्यात आली. ‘विष्णू के छठे अवतार परशुराम की जयजयकार’ अशा गगनभेदी जयघोषाने वातावरण दुमदुमले होते. तरुणाईचा जोश, जल्लोष कसा असतो ते आजच्या शोभायात्रेत अनेकांनी ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवला. ब्रह्मगर्जना या ढोलपथकाने नावाप्रमाणेच जोरदार ढोलवादन करून भगवान परशुरामाचा गजर केला. पोपटी रंगाचा कुर्ता, पांढरा पायजामा व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ‘जय परशुराम’ असे लिहिलेल्या टोप्या, असा गणवेश या ढोलपथकाचा होता. चॉकलेटी रंगाचा कुर्ता व पांढरा फेटा बांधलेले १८० युवक-युवतींच्या ‘ब्रह्मनाद’ या जम्बो ढोलपथकाने ‘एकही नारा, जय श्रीराम’ अशी गर्जना करीत तुफान ढोलवादन करून सर्वांना थकीत केले, तसेच सोनेरी कुर्ता व लाल धोतर परिधान केलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ ढोलपथकानेही ढोलवादनासोबत लाठी, तलवारबाजीचे थरारक प्रात्यक्षिक दाखवून सर्वांची दाद मिळविली.

याशिवाय नादगंधर्व ढोलपथक, ब्रह्मशौर्य ढोलपथकानेही तेवढ्याच दमदारपणे ढोलवादन करून दणदणाट निर्माण केला. भार्गव केसरी वाद्य पथकात पारंपरिक वेशभूषेतील तरुणी व महिलांनी लेझीमचे उत्तम सादरीकरण केले. सर्व ढोलपथकांना संधी मिळावी यासाठी शोभायात्रा मार्गावर क्रमांकानुसार जागा निवडून दिल्या होत्या. त्या ठिकाणी २० मिनिटात आपले ढोलवादन पार पाडणे बंधनकारक होते. त्यानुसारच शिस्तीचे दर्शन ढोलपथकांनी घडविले. खऱ्याअर्थाने युवक-युवतींच्या ढोलपथकांमुळे शोभायात्रेची शोभा वाढली. शोभायात्रेत खा.चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी, शिरीष बोराळकर, राजू वैद्य, मकरंद कुलकर्णी, बंडू ओक, प्रफुल्ल मालानी आदी लोकप्रतिनिधी हजर होते. यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष अनिल पैठणकर, प्रकल्प प्रमुख आशिष सुरडकर, तसेच सुरेश देशपांडे, मिलिंद दामोदरे, आनंद तांदुळवाडीकर, धनंजय पांडे, प्रमोद झाल्टे, अनिल खंडाळकर, सचिन वाडेपाटील, सुभाष बिंदू, राजेंद्र कुलकर्णी, अतुल जोशी, नीलेश सातोनकर, आर.बी. शर्मा, सतीश उपाध्याय, मिलिंद पिंपळे, मंगेश पळसकर, जीवन कुलकर्णी, संजय पांडे, विजया कुलकर्णी, मीनाक्षी देशपांडे, वनीता पत्की, गीता आचार्य, शुभांगी कुलकर्णी, अनुराधा पुराणिक, अंजली गोरे, स्मिता दंडवते,नीता पानसरे, विजया अवस्थी, विनिता हर्सूलकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, समाजबांधवांनी परिश्रम घेतले.संतांची उपस्थितीशोभायात्रेत साधू-संतांच्या उपस्थितीने सर्वांचा आनंद द्विगुणित झाला. पहिल्या रथात आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज व योगिराज गोसावी पैठणकर महाराज विराजमान होते. दुसºया रथात माई महाराज विराजमान होत्या, तर तिसºया रथात चार वेदाचे पंडित, घनपाठी बसले होते.परशुरामाच्या मूर्तीने लक्ष वेधलेराजस्थानी विप्र मंडळाच्या वतीने ८ फूट उंचीची भगवान परशुरामाची भव्य मूर्ती शोभायात्रेत सर्वांचे आकर्षण ठरली. मंगलकलश डोक्यावर घेऊन या मंडळाच्या महिला सहभागी झाल्या होत्या. उत्तरदेशीय ब्राह्मण सेवा समितीच्या वतीने सुंदर सजविलेली पालखी ज्यात परशुरामाची प्रतिमा ठेवण्यात आली होती. ही पालखीही लक्षवेधी ठरली.चित्ररथाचेही आकर्षणएका रथात सोहम पटवारी व वेद जोशी या बालकांनी परशुरामाची वेशभूषा केली होती. याशिवाय रेणुकामातेच्या मंदिराचा देखावा एका चित्ररथात होता. विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्था व कण्व ब्राह्मण समाजाच्या चित्ररथात उपक्रमाची माहिती देण्यात आली होती. राघवेंद्र सेवा संघाचा चित्ररथही लक्षवेधी ठरला. सर्व शाखीय ब्राह्मण सभा, बेगमपुरातील महिलांनी हातात ब्राह्मण समाजातील विविध पोटजातीचे फलक घेतले होते. कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे परशुरामाची इकोफ्रेंडली प्रतिमा तयार केली होती.

टॅग्स :communityसमाजAurangabadऔरंगाबादSocialसामाजिक