औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्ण अधिक राहिले. दिवसभरात ७१ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ८२ जण कोरोनामुक्त झाले. उपचार सुरू असताना जिल्ह्यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात आता एकूण रुग्णांची संख्या ४५ हजार ८८९ झाली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत ४४ हजार २०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एक हजार २०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ७१ रुग्णांत मनपा हद्दीतील ६४, ग्रामीण भागातील ७ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ७३ आणि ग्रामीण भागातील ९, अशा एकूण ८२ रुग्णांना सोमवारी सुटी देण्यात आली. पुंडलिकनगरातील ७८ वर्षीय पुरुष आणि वैजापूर तालुक्यातील लक्ष्मीनगरातील ५७ वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
रुग्ण : विष्णूनगर १,चौधरी हेरीटेज ३, कुशलनगर २, म्हसोबानगर २, सातारा परिसर १, उस्मानपुरा १, माउलीनगर २, गारखेडा परिसर १, दिशा संकुल १, एन-८, सिडको १, संजयनगर १, साईनगर ३, समृद्धीनगर १, एन-३, सिडको १, मुकुंदवाडी १, शिवेश्वर कॉलनी ५, हर्सूल ४, सुपर थर्टी इंग्लिश स्कूल २, अन्य ३१. अन्य ७.