लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : यंदा अवघ्या ११ महिन्यांत १ लाख ५३ हजार ९०७ शौचालये पूर्ण करून राज्य शासनाचे हगणदारीमुक्त जिल्ह्याचे आव्हान औरंगाबादजिल्हा परिषदेने समर्थपणे पेलले. यासंदर्भात गेल्याच आठवड्यात मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड, स्वच्छ भारत मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, दोन बीडीओ व ग्रामसेवकांचा मुंबईत शासनामार्फत सत्कारही करण्यात आला.तथापि, बेसलाईन सर्वेक्षणातील कुटुंबांच्या घरांमध्ये शौचालये उभारण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्हा हगणदारीमुक्त झालेला असला तरी तो संपूर्णपणे झालेला नाही. बेसलाईन सर्वेक्षणाबाहेरील सुमारे ७० ते ७२ हजार कुटुंबांच्या घरी अद्यापही शौचालये उभारण्यात आलेली नाहीत, अशा कुटुंबांच्या घरी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शौचालये उभारण्यास मान्यता दिली जाणार आहे; पण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केलेल्या कामांच्या तक्रारी होत असल्यामुळे ग्रामसेवक शौचालये उभारण्यास किती रस घेतील, यावर बरेच काही अवलंबून आहे. दुसरीकडे, ज्या कुटुंबांच्या घरी शौचालये उभारण्यात आलेली आहेत ते याचा वापर करतात का, हा देखील संशोधनाचा वेगळा विषय आहे. सन २०१२ मध्ये जिल्ह्यात बेसलाईन सर्वेक्षण करण्यात आले होते. गावागावांत फिरून शौचालयाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी राजकीय विरोधी गटांतील कुटुंबे, कामानिमित्त काही काळासाठी स्थलांतरित झालेली कुटुंबे, अशा अनेक कुटुंबांना बेसलाईन सर्वेक्षणात सामावून घेतलेच नव्हते. सध्या अशा गावागावांत अनेक कुटुंबांकडे आजही शौचालये नाहीत.प्रधानमंत्र्यांनी हाती घेतलेल्या हगणदारीमुक्त गावे या चळवळीमध्ये जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांनी सहभाग घेतला होता. घर तेथे शौचालय या मुख्य उपक्रमाबरोबरच घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन तसेच शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता आणि स्वच्छ पिण्याचे पाणी हे या अभियानातील महत्त्वपूर्ण घटक आहेत. आजही अनेक शाळांमध्ये पाण्याअभावी स्वच्छतागृह ओस पडले आहेत. अनेक ग्रामपंचायती सांडपाणी व घनकचऱ्यांबाबत गंभीर नाहीत. अनेक गावांना मिळेल त्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे, या बाबींकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.आज ग्रामसेवकांची कार्यशाळाच्हगणदारीमुक्त जिल्हा झाला आता पुढे काय, या विषयावर उद्या जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांची कार्यशाळा आयोजित केली आहे. ही कार्यशाळा उद्या सकाळी १० वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सिडको परिसरातील संत तुकाराम नाट्यगृहात चालणार आहे.च्यामध्ये हगणदारीमुक्त गावांचे सातत्य राखणे, शौचासाठी बाहेर कोणीही जाऊ नये, याची खबरदारी घेणे, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, आपले सरकार केंद्रांतर्गत कोणती व किती प्रमाणपत्रे दिली जावीत, ग्रामपंचायतींचे आॅनलाईन रेकॉर्ड पद्धत आदी बाबींवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
औरंगाबाद जिल्हा हगणदारीमुक्त?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:40 AM
यंदा अवघ्या ११ महिन्यांत १ लाख ५३ हजार ९०७ शौचालये पूर्ण करून राज्य शासनाचे हगणदारीमुक्त जिल्ह्याचे आव्हान औरंगाबाद जिल्हा परिषदेने समर्थपणे पेलले.
ठळक मुद्देबेसलाईन सर्वेक्षण : ७० हजार कुटुंबांकडे अद्यापही नाहीत शौचालये