लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत औरंगाबाद जिल्ह्यातही उत्तीर्णतेमध्ये मुलींनीच बाजी मारली आहे.औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद जिल्ह्याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. विभागाची उतीर्णतेची आकडेवारी ८८.८१ टक्के एवढी असताना जिल्ह्याची आकडेवारी ९०.८५ टक्के एवढी आहे. जिल्ह्यात एकूण ६५ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी आवेदन भरले होते. यात ३६ हजार ८३० मुले आणि २८ हजार ५४७ एवढ्या मुलींचा समावेश आहे. यापैकी ३२ हजार ६५३ मुले उत्तीर्ण झाली असून, टक्केवारीत ८८.६६ एवढा निकाल लागला आहे, तर २६ हजार ७४२ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांची उत्तीर्णतेची आकडेवारी ९३.६८ टक्के एवढी आहे. यातच औरंगाबाद जिल्ह्यात प्रावीण्य श्रेणीत २० हजार १३४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे, तर प्रथम श्रेणीत २३ हजार ७९१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात मुलींनी मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 12:12 AM
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत औरंगाबाद जिल्ह्यातही उत्तीर्णतेमध्ये मुलींनीच बाजी मारली आहे.
ठळक मुद्देदहावीचा निकाल : ९३.६८ टक्के मुली उत्तीर्ण; मुलांची टक्केवारी ८८.६६