लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांतील पावसामुळे पिकांवरील संकट दूर झाले आहे; परंतु जिल्ह्यात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत २२ टक्के पाऊस कमी पडला आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जिल्ह्यात औरंगाबाद तालुका वगळता एकाही तालुक्याने अद्यापही अपेक्षित सरासरी गाठली नाही. औरंगाबाद तालुक्यात १०५ टक्के पाऊस झाला आहे. पाठोपाठ फुलंब्री अणि वैजापूर तालुक्यात अधिक पाऊस झाला आहे. पैठण, सिल्लोड, सोयगाव, गंगापूर, कन्नड तालुक्यांमध्ये ७० टक्क्यांवर पाऊस झाला. जिल्ह्यात सर्वाधिक कमी पाऊस खुलताबाद तालुक्यात झाला आहे.जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात पावसाने ओढ दिली. या दोन्ही महिन्यांत पाच ते सहा दिवस वगळता पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले. तब्बल महिनाभरानंतर १६ आॅगस्ट रोजी पावसाने पुनरागमन क रून जिल्ह्यात चांगली हजेरी लावली. श्रावण सरींनी जिल्ह्याला अक्षरशा: धुवून काढले. या दिवशी यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच धुवाधार पाऊ स झाल्याने शेतक ऱ्यांचा जीव भांड्यात पडला. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे पाणीटंचाईबरोबर दुष्काळाची छाया दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गेल्या दोन महिन्यांत खुलताबाद तालुक्यात नागरिकांना पावसाअभावी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. ही परिस्थिती इतर तालुक्यांमध्येही होती. मात्र, आठवडाभरातील पावसाने पाणीटंचाई कमी होण्यास हातभार लागला आहे. पावसाने गेल्या दोन दिवसांपासून उघडीप दिली आहे. अधूनमधून रिमझिम पाऊस होत आहे. जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यापर्यंत सरासरीच्या तुलनेत ७८ टक्के पाऊस झाला आहे.शहरात शनिवारी दुपारी ९.२ मि.मी.औरंगाबाद : शहरात शनिवारी दुपारी काही मिनिटांसाठी जोरदार पावसाने हजेरी लावली. अवघ्या काही वेळेसाठी बरसलेल्या पावसाने ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले. चिकलठाणा वेधशाळेत ९.२ मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली.शहरात दुपारी २ वाजेच्या सुमारास रिमझिम स्वरूपात पावसाला सुरुवात झाली; परंतु पावसाने लगेच आटोपतेही घेतले. त्यानंतर दुपारी ३ वाजता पुन्हा पावसाला सुरुवात झाली. यावेळी पावसाचा जोर चांगलाच होता. पावसासोबत जोरदार वारेही वाहत होते. शहराला पुन्हा एकदा पाऊस धुऊन काढणार, अशी अपेक्षा व्यक्त होत होती.पावसाने १५ ते २० मिनिटांतच आटोपते घेतले. पावसामुळे रस्त्यांवर चांगलेच पाणी साचलेले पाहायला मिळाले. उच्च न्यायालय परिसर, सेव्हन हिल, आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक, चेतक घोडा, न्यायनगर परिसरासह ठिकठिकाणी पाणी साचले होते.जोरदार पावसानंतर अधूनमधून हलक्या स्वरूपात श्रावणसरी पडत होत्या. काही वेळेसाठी सूर्यदर्शन झाले. त्यानंतर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आकाशात पुन्हा मोठ्या प्रमाणात ढग दाटून आले; परंतु पावसाची वाटच पाहण्याची वेळ शहरवासीयांवर आली.
औरंगाबाद जिल्ह्यात २२ टक्के पाऊस कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:37 AM
औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांतील पावसामुळे पिकांवरील संकट दूर झाले आहे; परंतु जिल्ह्यात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत २२ टक्के पाऊस कमी पडला आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
ठळक मुद्देअजूनही प्रतीक्षा : अनेक तालुक्यांनी सरासरीही गाठली नाही; औरंगाबादेत उत्तम स्थिती